भजनाचा कार्यक्रम चालू असतानाच ‘ती’ महिला मद्यपान करून झाली ‘तर्रर्र’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असू यामध्ये एक महिला सिगरेट ओढताना दिसत असून यापासून धुराची कलाकारी दिसून येत आहे. त्यानंतर हि महिला दारू प्यायला लागते. त्यानंतर आजूबाजूचे लोक मोठ्या प्रमाणात टाळ्या वाजवतात.

त्यानंतर हार्मोनियम आणि टाळ्यांचा आवाज वाढत जातो. या सगल्यानंतर ती महिला पुन्हा एकदा सिगरेट ओढत नाचते. आजूबाजूचे लोकदेखील तिच्याबरोबर नाचताना दिसून येतात. समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारा ५० सेकंदाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्याचबरोबर या व्हीडीमधील महिलेचे कृत्य देखील फार गोष्टी सांगून जाते.

व्हिडीओ अपलोड करणाऱ्यावर होणार कारवाई
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पंजाब राज्य महिला आयोगच्या अध्यक्षा मनीषा गुलाटी यांनी याविषयी बोलताना म्हटले कि,या व्हिडिओमध्ये जे दिसत आहे ते जर खरे असेल तर ते फार चुकीचे आहे. अंधविश्वास आणि आस्थेच्या नावाखाली जर अशा प्रकारे स्त्रिया आणि समाजाशी खेळ होत असेल तर हे फार भयानक आहे. त्याचबरोबर पोलिसांनी या गोष्टीचा तातडीने तपास करून हा व्हिडीओ अपलोड करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करायला हवी.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like