जेव्हा रॅम्प वॉक करताना घसरून पडल्या ‘या’ 5 अभिनेत्री ! वाटली होती ‘लाज’

पोलिसनामा ऑनलाइन –अनेक अभिनेत्री आणि मॉडेलला आपण रॅम्प वॉक करताना पहात असतो. परंतु कधी कधी असंही होतं की, त्या घसरतात, पडतात किंवा त्यांच्या ड्रेसमध्येही अडकून जातात. अशाच काही अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत.

1) यामी गौतम- 2019 मध्ये झालेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये यामी गौतमनं रॅम्प वॉक केलं होतं. तेव्हा अचानकच ती पडली होती. परंतु ऐनवेळी तिनं स्वत:ला सावरलंही होतं.

2) कंगना रणौत- कंगना रणौत एकदा रॅम्प वॉक करत असताना तिचा पाय ड्रेसमध्ये अडकल्यानं ती पडली होती.

https://www.instagram.com/p/Bisqv67A6G3/

https://www.instagram.com/p/Bf4ejtGAIBK/

3) सोनाक्षी सिन्हा- सोनाक्षी ब्लेंडर्स प्राईड फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक करत होती. यावेळी तिनं घातलेला गाऊन तिच्या हिल्समध्ये अडकला आणि ती खाली पडली होती.

4) पूनम ढिल्लन- डिझायनर विक्रम फडनीसाठी पूनम ढिल्लन रॅम्प वॉक करत होती. परंतु अचानक ती पडली. परंतु पुन्हा उठून आत्मविश्वासानं तिनं रॅम्प वॉक पूर्ण केलं.

5) सोना मोहपात्रा- बॉलिवूडमधील फेमस सिंगर सोना मोहपात्रा लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक करत होती. यावेळी ती पडली. परंतु स्वत:ला सावरत तिनं वॉक पूर्ण केलं.