हॉलिवूडची ‘ही’ भारतीय अ‍ॅक्ट्रेस घेत नाही ‘हृतिक रोशन’चा ‘फोन’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईत जन्मलेली फ्रीडा पिंटोने आज इंटरनॅशनल सिनेमात आपलं एक वेगळं स्थान तयार केलं आहे. एका दशकापूर्वी स्लमडॉग मिलियनेयर या सिनेमामुळे तिला खूपच लोकप्रियता मिळाली. फ्रीडा ब्रिटीश अमेरिकन सिनेमात खूप अ‍ॅक्टीव आहे. फ्रीडाने तृष्णा आणि डेजर्ट डान्सर या सिनेमात काम केलं आहे. फ्रीडाने जंगल बुकवर आधारीत सिनेमा मोगलीमध्ये काम केलं आहे.

खास बात अशी की, फ्रीडा पिंटोचा सिनेमा डेजर्ट डान्सर पाहून हृतिक रोशन खूपच प्रभावित झाला होता. हृतिक तिच्या डान्सने इतका इम्प्रेस झाला होता की, त्याने ट्विटरवर पूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या होत्या.

तीन वर्षांपूर्वी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं की, “तुम्ही कोणी डेजर्ट डान्सर हा सिनेमा पाहिला आहे का ? हा सिनेमा पॅशनने भरपूर आहे. मी पाहिलेला आतापर्यंतचा सर्वात उत्तम सिनेमा आहे. सर्वांनीच खूप कमाल काम केलं आहे. मी सर्व टीमला शुभेच्छा देतो.”

आपल्या आणखी एका ट्विटमध्ये हृतिक म्हणाला होता की, “फ्रीडा पिंटोने या सिनेमात कमाल केली. मी तिच्यासारखं डान्स करताना कोणालाच नाही पाहिलं. मी तिला फोन करून शुभेच्छा देणार होतो परंतु ती माझा फोन घेत नाही. आशा करतो या पोस्टमधून माझं म्हणणं तिच्यापर्यंत पोहोचेल.

लव सोनियामध्ये फ्रीडाने केलं भारतीय स्टार्ससोबत काम
फ्रीडाने अनेक इंडियन स्टार्ससोबत काम केलं आहे. ग्लोबल सेक्स ट्रेडवर बनलेला सिनेमा लव सोनिया या सिनेमातही फ्रीडाचे आपल्या दमदार अभिनयासाठी सर्वांनी कौतुक केले. या सिनेमात फ्रीडा पिंटो, मृणाल ठाकुर, मनोज वाजपेयी, राजकुमार राव, ऋचा चड्डा, अनुपम खेर, आदिल हुसैन, डॅमी मूर आणि मार्क डुप्लास यांसारखे कलाकार होते.

फ्रीडाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, 2013 साली तिने इंटरनॅशनल सिंगर ब्रूनो मार्सच्या म्युझिक व्हिडीओ गोरिल्लामध्ये काम केलं होतं. यामुळे तिच्यावर खूप टीका झाली होती. कारण या व्हिडीओत तिने मार्स सोबत बोल्ड सीन दिले होते.

View this post on Instagram

Date night! @forevermarkusa #forever #tributetoyou

A post shared by Freida Pinto (@freidapinto) on

View this post on Instagram

Just….

A post shared by Freida Pinto (@freidapinto) on

Visit : policenama.com