जेव्हा दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांनी सेटवरच फाडला होता स्वत:चा शर्ट ! ऋषी कपूर यांनी सांगितलं

पोलिसनामा ऑनलाइन –दिग्गज स्टार ऋषी कपूर आज आपल्यात नाहीत. त्यांनी आपल्या ऑटोबायोग्राफीत अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. एक काळ असाही होत जेव्हा ते खूप डिप्रेस्ड झाले होते. त्यांनी यबद्दलही सांगितलं आहे की, प्रसिद्ध दिग्गज स्टार दिलीप कुमार यांनीही कसा तणावात येऊन आपल शर्ट फाडला होता.

ऋषी यांनी लिहिलं की, “1980 साली माझा कर्ज हा सिनेमा रिलीज झाला होता. याचं म्युझिक शानदार होतं. स्टोरीलाईनही चांगली होती. मी सुभाष घईंसोबत काम करत होतो. मला या सिनेमाकडून खूप आशा होत्या. परंतु या सिनेमाच्या एका आठवड्यानं रिलीज झालेल्या कुर्बानी या सिनेमानं आमच्या सिनेमाला मागे टाकायला सुरुवात केली.”

ऋषी यांनी पुढे लिहिलं की, “कुर्बानी सिनेमात जीनत अमान, विनोद खन्ना, फिरोज खान यांचा डॅशिंग अंदाज आमच्या सिनेमावर भारीत पडत होता. मला वाटलं या सिनेमानं माझं करिअर एका वेगळ्या उंचीवर जाईल परंतु असं झालं नाही. मी खूप डिप्रेशनमध्ये गेलो होतो. माझा आत्मविश्वासही कमी झाला होता. मी कॅमेरा फेस करण्याच्या अवस्थेत नव्हतो. माझ्यामुळे तीन चार सिनेमे अडकले होते.”

पुढे ऋषी सांगतात, “माझे वडिल राज कपूर यांनीही सांगितलं होतं की, 1966 साली रिलीज झालेला सिनेमा दिल दिया दर्द लिया दरम्यान दिलीप कुमार यांनीही अशा प्रकारे ट्रामा आणि डिप्रेशनमुळं सेटवरच आपला शर्ट फाडला होता. मला असं कधी वाटलं नव्हतं की अॅक्टर्सलाही असं डिप्रेशन येऊ शकतं. मी स्वत: आधी कधी यातून गेलो नव्हतो.”