जेव्हा विराट कोहली बोलला मराठीतून….

राजकोट : पोलीसनामा ऑनलाईन

वेस्ट इंडिज विरुद्ध होत असलेल्या पहिल्या कसोटीत मुंबईचा तसेच अंडर १९ मध्ये विश्वचषक मिळवून देणारा कर्णधार पृथ्वी शॉ, कर्णधार विराट कोहली बरोबर टीम मध्ये प्रदार्पण करणार आहे. हा सामना आज ( ४ आक्टोबर ) राजकोट मध्ये होणार आहे.

स्वतःच्या देशाकडून आणि ते पण वयाच्या १८ – १९ वर्षी खेळणे हि खूप अभिमानाची बाब असते. इतकेच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरून अंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतांना खेळाडूवर दबाव निर्माण होत असतो. मात्र  पृथ्वी शॉ ला विचारले तुमच्यावर दबाव आहे का ? त्यावेळेस त्याने कर्णधार विराट कोहलीमुळे दबाव नसल्याचे सांगितले.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a52e5960-c796-11e8-b818-f3a5bedbcc01′]

यादरम्यान स्वतःच्या कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय पहिली मॅच खेळणारा पृथ्वी शॉ वरचा दबाव कमी करण्यासाठी कर्णधार विराट कोहलीने पृथ्वी शॉ सोबत थेट मराठीत संवाद साधला आहे. इतकेच नव्हे तर शॉ सोबत मराठीत संभाषण करून त्याला आपलेसे केले. टीम च्या कर्णधाराच्या अश्या या प्रेमळ बोलण्यामुळे नवीन खेळाडूंवरचा दबाव कमी होत असतो त्याच प्रमाणे शॉ ही कोहलीच्या अश्या बोलण्याने दबावमुक्त झाला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’03fcac35-c797-11e8-916e-632ec91fddbf’]

याचबरोबर माध्यमांशी बोलताना, मैदानाबाहेर विराट कोहली एक मजेशीर, विनोदी माणूस आहे. मैदानावर तो किती गंभीर असतो हे आपण पाहिले आहे. मी कोहली बरोबर संवादही साधला, त्यावेळी त्याने मला विविध विनोद ऐकवले. त्याने माझ्याशी मराठीतही बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र ते खूपच विनोदी होते .असे शॉ ने सागितले. इतकेच नव्हे तर टीम इंडियातील निवडीबद्दल त्याला विचारण्यात आले तेंव्हा मला खूपच भारी वाटत आहे. थोडा दबाव वाटत होता. मात्र ड्रेसिंग रुममध्ये विराट भाई आणि रवी शास्त्री सरांनी  इथे कोणीही ज्युनिअर-सीनियर नाही हे सांगितले. त्यावेळी माझ्या वरील दबाव कमी झाला.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b0e91fd7-c796-11e8-9cad-c32002718b1c’]

ड्रेसिंग रुममध्ये मला पाहून सर्वजण खूश होते. आम्ही पहिले सराव सत्र खूप चांगल्यारितीने पूर्ण केला, रवी सरांनी मला खेळाचा आनंद घेण्यास सांगितले. ज्याप्रमाणे रणजी ट्रॉफीत खेळतोस, त्याचप्रमाणे खेळ, असा सल्लाही त्यांनी दिला, असेही शॉ ने सांगितले.