‘देहाकडुन देवाकडे जाताना मधे देश लागतो, त्या देशाच आपण काहीतरी देणं लागतो’ – स्मिता कुलकर्णी

लासलगाव : स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी निमित्ताने श्रीराम मंदिर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन सोशल डिस्टन्स चे पालन करून करण्यात आले.

या प्रसंगी ब्राह्मण महासंघाच्या प्रदेश कार्याध्यक्ष सौ. स्मिता कुलकर्णी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे प्रसिद्ध वाक्य “देहा कडुन देवाकडे जाताना मधे देश लागतो, त्या देशाच आपण काहीतरी देणं लागतो.” हे वाक्य बोलून आपल्या मनोगताची सुरवात केली.

स्वातंत्र्यवीर सावरकरांची हि ५५ वी पुण्यतिथी निमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकरांना “भारतरत्न” हा पुरस्कार मिळावा यासाठी संपुर्ण महाराष्ट्रातुन ५५,००० सह्या असलेले पत्र ते शासनाला पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. ऋषीकेश जोशी यांनी सुद्धा यावेळी सावरकरांच्या आठवणींना उजाळा देत सावरकरांचे विचार थोडक्यात मांडले. गेल्या सहा वर्षांपासून २६ फेब्रुवारी ला मोठ्या प्रमाणावर व्याख्यानाचे आयोजन होत असते मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त प्रतिमा पूजनाचा आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी नामको बँकेचे संचालक प्रकाश दायमा, श्रीराम मंदिर पुजारी अशोकराव अग्निहोत्री, भास्कर जोशी, महासंघ जिल्हाध्यक्ष गणेश जोशी, कैलास उपाध्ये, ऋषीकेश जोशी, सौ. रजनी कुलकर्णी, सौ. अक्षदा जोशी तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ऋषीकेश कुमावत, प्रणव साखरे, प्रथमेश कुलकर्णी आणि सावरकर प्रेमी उपस्थितीत होते.