सरसकट कर्जमाफी कधी ? शेतकऱ्यांचा विसर पडता कामा नये

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – ‘ना मंत्री, ना सरकार’ असं हे महाविकासआघाडीचे सरकार आहे. सरकार स्थापन होऊन अनेक दिवस झाले तरी अद्याप या सरकारने खातेवाटप केलं नाही, त्यामुळे प्रश्न नेमके कुणाला विचारायचे, असा प्रश्न आम्हाला पडला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. तसेच, सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, तो कधी कोरा होणार? सरसकट कर्जमाफी कधी करणार ? निवडणूक काळात या राजकीय पक्षांकडून जी सर्व आश्वासनेच होती, तीची आठवण आम्ही करून देत आहोत. किमान याचा कार्यक्रम तरी जाहीर करावा, अशी मागणीही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

तसेच फडणवीस पुढे म्हणाले कि, हे सरकार स्थगिती सरकार असल्याने राज्य जवळजवळ ठप्प झाल्याचं दिसत आहे. सरकारच्या भूमिकेमुळे राज्यात असंतोष निर्माण होत आहे. राज्यात सरकारच्या धोरणांचा परिणाम होत आहे. गुंतवणुकदारांवर परिणाम होतोय. त्यामुळे सरकारने तात्काळ कामं सुरु करावी. उन्हाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण व्हावी. सरकारमध्ये जाणीवपूर्वक आर्थिक स्थितीबाबत दिशाभूल करणारी वक्तव्ये देण्यात येत आहे. कर्जाचा आकडा फुगवला जात असून आकड्यांची जुगलरी केली जात आहे. राज्याची आर्थिक स्थिती चांगली असुनदेखील आर्थिक स्थितीचे कारण सांगून सरकारने हात वर करू नये.

शिवसेना आमच्यासोबत असताना एकमताने निर्णय झाले होते. आता, त्यांच्याकडून काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते निर्णय बदलावून घेत आहेत. विरोधी पक्ष म्हणून आम्ही जनतेचे मुद्दे मांडू. सत्तेसाठी किती काळ लाचारी स्वीकारली जाईल हे सेनेला ठरवायचे आहे. तसेच सावरकरांच्या केलेल्या विधानाबद्दल राहुल गांधींनी माफी मागवी, अशी मागणीही फडणवीस यांनी केली.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/