Pfizer ची लस कधी मिळणार?; पुणेकराचं डायरेक्ट CEO ना पत्र, अन्..

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भारतात लसीकरणाला सुरुवात झाली आणि मध्यंतरी लसीचा तुटवडा जाणवूं लागला. परदेशी लसी भारतात उपलब्ध होणार असल्याचं सरकार सतत सांगताय. मात्र, सध्याही लसीचा तुटवडा आहेच. यावरून आता एका पुणेकराने चक्क फायझरच्या (Pfizer) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांना एक पत्र लिहले आहे. पुणेकरांच्या त्या पत्रावरून Pfizer ने तातडीने उत्तर देत भारत सरकार कडून अजून परवानगी न मिळाल्याने उशीर होत असल्याचे सांगण्यात आले आहे.

हिंदीसह इतर भारतीय भाषांमध्ये सुद्धा होईल इंजिनियरिंगचे शिक्षण, एआयसीटीईने (AICTE) दिली परवानगी

पुण्यामधील प्रकाश मिरपुरी यांनी Pfizer चे CEO अल्बर्ट बऊर्ला याना पत्र लिहले आहे. आणि त्यांनी लगेच उत्तर देखील दिले आहे. तर प्रकाश मिरपुरी म्हणाले, मला कोरोना झाल्यानंतर रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते. त्यानंतर मी फायझर, मॉडर्ना चे शेअर विकत घेतले. माझा कुटुंबाला सर्वोत्तम लस मिळावी अशी माझी इच्छा होती. म्हणून ती नेमकी कधी उपलब्ध होणार हे जाणून घेण्यासाठी मी थेट CEO यांच्याशी संपर्क साधला. त्यानंर्र त्यांनी तातडीने मला उत्तर दिले. जर एका आंतरराष्ट्रीय कंपनीचा CEO एका भागधारकाला २४ तासाच्या आत उत्तर पाठवत असेल तर सरकारचा बाबतीतही हे वेगाने व्हायला हवे. सरकार ने तातडीने पावलं उचलायला हवीत असे मला वाटते. असे पुणेकर प्रकाश मिरपुरी यांनी सांगितले आहे.

सर्चचा sex education कार्यक्रम आता YouTube वर देखील उपलब्ध, संचालिका डॉ. राणी बंग करणार मार्गदर्शन

काय म्हणाले Pfizer?
आम्हालाही भारतात लवकरात लवकर लस उपलब्ध करून द्यायची इच्छा आहे. परंतु, सरकार कडून परवानग्या मिळाल्या नाहीत. आम्ही आमचा बाजूने पूर्ण प्रयत्न करत आहोत आणि सरकार बरोबर करार व्हावा यासाठी शक्य ती सर्व पावले उचलत आहोत. परंतु, एखाद्या देशाला लसींचा साठा पुरवणे हा मात्र त्या देशाचाच आरोग्य विभागाचा सल्ल्याने घेतलेला निर्णय असतो असे Pfizer म्हटले आहे.

WhatsApp वर तीन रेड टिकचा काय आहे अर्थ? सरकार तुमच्यावर ठेवणार का लक्ष?, जाणून घ्या

या दरम्यान, केंद्राकडून परदेशी लसी जुलै महिन्यात येतील आणि त्यानंतर लसीकरण प्रक्रियेत दिलासा मिळेल असं म्हटलं जातेय. Pfizer ची परिणामकारकता लक्षात घेता अनेक लोक ही लस घेण्यासाठी थांबले देखील आहेत. परंतु, ही लस सामान्यांना नेमकी कधी उपलब्ध होईल याचा स्पष्ट अंदाज अजून देखील आलेला नाही.

READ ALSO THIS

ACB Trap : लाच म्हणून घेतली ‘दारु-मटणा’ची पार्टी; ताव मारत असतानाच अधिकार्‍यांना अ‍ॅन्टी करप्शननं रंगेहाथ पकडलं, पुढं झालं असं काही…

Maratha Reservation : ‘…पण संभाजीराजेंना खरी भेट पंतप्रधान मोदींनी द्यायला हवी’

OBC Reservation : ठाकरे सरकारला मोठा झटका ! स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त OBC आरक्षण रद्द, SC नं याचिका फेटाळली