शिरूर तालुक्यातील महसुल विभागाचे कारनामे थांबणार केव्हा ?
शिक्रापुर : शिरुर तालुक्यात काळया सोन्याच्या मोहापायी महसुल ची पुरती बदनामी होत असुन त्यातच आता लाचलुचपत खात्याच्या गळाला महसुल विभागाचा कर्मचारी लागला असल्याने शिरुर तालुक्यात पुन्हा एकदा महसुल विभागाची चर्चा रंगु लागली आहे. शिरुर तालुक्यातील पाबळ येथील महसुल विभागाचा मंडल अधिकारी अमोल खोल्लम यावर नुकतीच लाचलुचपत विभागाने कारवाई करत लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडले आहे.परंतु हि पहिलीच अशी कारवाई नसुन आतापर्यंत शिरुर तालुक्यात जेव्हा जेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाया केल्या त्या पैकी सर्वाधिक कारवाया या महसुल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावरच झाल्या असल्याचे दिसुन आले आहे.
शिरुर तालुक्याच्या हद्दीत जमीनींना आलेले सोन्याचे भाव,त्याचप्रमाणे शिरुर तालुक्यातुन वाहत असलेल्या घोड आणि भिमा नदी व तालुक्यात सुरु असलेली वाळु चोरी ही सातत्याने चर्चेत आली आहे.या काळ्या सोन्याच्या मोहाला सर्वाधिक महसुलचे अधिकारी बळी पडले असुन या तडजोडीपायी महसुलची पुरती बदनामी होत आहे.गेल्या काही दिवसात शिरुर तालुक्यातील वाळूच्या अनेक प्रकरणामुळे महसूल विभाग मोठा चर्चेत आला होता. याबाबत महसूल विभागाचा कारभारावर मोठ्या प्रमाणात चर्चा देखील रंगल्या तर अनेकांनी महसूल विभागाच्या कारभारावर टीका केली.यानंतर महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची तसेच कर्मचाऱ्यांची चौकशी करू असे देखील सांगितले .तर काही सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांनी महसूल विभागाच्या कारभाराची चौकशी करण्याची लेखी मागणी जिल्हाधिकारी,महसुलविभाग,महसुलमंञी यांच्या कडेही केली. परंतु तरी देखील शिरूर तालुक्यातील महसुल विभागाचे कारनामे काही थांबायचे नाव घेइना. आता पुन्हा एकदा शिरूर तालुक्यातील पाबळ येथील मंडळ अधिकारी अमोल निवृत्ती खोल्लम (वय ४० वर्ष) हे वाळू चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पंधरा हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले.या सर्व होणा-या कारवाया व वाळुचा लिलाव झालेला नसतानाही शिरुर तालुक्यातुन सुरु असलेला राञी-अपराञीचा चोरुन वाळुउपसा याकडे वरिष्ठ लक्ष देणार का ? महसुलची होणारी बदनामी थांबणार का ? असे अनेक सवाल सर्वसामान्य नागरिक करत असुन पुणे जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी डाॕ राजेंश देशमुख यांच्या समोर शिरुर तालुक्यातील महसुल विभागातील एकामागून ऐक येणारे कारमाने थांबवण्याचे मोठे आव्हान असुन जिल्हाधिकारी याकडे गांभिर्याने पाहणार का ? असा सवाल देखील नागरिकांकडुन उपस्थित केला जात आहे.
तर गेल्याकाही दिवसापासून शिरुर महसुल मध्ये सुरु असलेल्या वाळू प्रकणात तर महसुलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने एका तक्रारदाराला चक्क एका अधिकाऱ्यांविरोधात लाचलुचपत कडे तक्रार करुन त्याची चौकशी करण्याचा खाजगीत सल्ला दिल्याचे एका तक्रारदाराने येथे नाव न छापणाच्या अटिवर “पोलिसनामा “शी बोलताना सांगितले .