खुद्द साक्षीदारच न्यायालयात घेऊन आला दारूची बाटली, पुढं झालं ‘असं’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – कौटुंबिक वादाच्या खटल्यात साक्ष द्यायला आलेल्या एका चालकानं न्यायालयाच्या इमारतीत दारूची बाटली आणल्यानं पोलिसांनी त्याला बेड्या ठोकत त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. गुरुवारी (दि 5 डिसेंबर) रोजी सकाळी 11 च्या सुमारास जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वारात ही घटना घडली. राम राजू पवार (29, रा कृष्णमंदी, रेल्वेगेट, चिकलठाणा) असं संशयिताचं नाव आहे. त्याच्याकडून 140 रुपये किंमची दारूची बाटली जप्त करण्यात आली आहे.

नेमकं काय झालं ?
वेदांतनगर पोलीस ठाण्याचे शिपाई संजय राठोड (39) यांच्या तक्रारीनुसार, जिल्हा न्यायालय इमारतीच्या प्रवेशद्वारावर राठोड व त्यांचे सहाकरी हवालदार दिगंबर राठोड, पोलीस शिपाई वंदना गवळी, वैशाली पांचाळ असे चाौघेही येणाऱ्या व्यक्तींची तपासणी करत होते. सकाळी 11.05 वाजताच्या सुमारास राम पवार हा तिथे आला. त्याच्यासोबत काही नातेवाईक आणि त्याच्याकडे एक बॅग होती. यावेळी तो न्यायालयात प्रवेश करत असताना पोलिसांनी तपासणीसाठी त्याची बॅग मागितली. आधी तर त्यानं यासाठी नकार दिला. परंतु पोलिसांनी त्याला समजावल्यानंतर मात्र त्यानं बॅग तपासणीसाठी दिली. यावेळी त्याच्या बॅगेत ओसी ब्ल्यू नावाची 140 रुपये किंमतीची दारूची बाटली पोलिसांनी सापडली.

आरोपीला न्यायालयीन कोठडी
यानंतर पोलिसांनी या आरोपीविरुद्ध कलम 64 (ख) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यानंतर त्याला जेव्हा न्यायालयात हजर केले तेव्हा त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. प्रभारी मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी याबाबत आदेश दिले.

Visit : Policenama.com