जेव्हा युलिया वंतूरला विचारलं कधी करणार समलान खान सोबत लग्न ? केलं मोठं वक्तव्य

पोलिसनामा ऑनलाइन –लॉकडाऊनमध्ये बॉलिवूड स्टार सलमान खानची गर्लफ्रेंड युलिया वंतूर त्याच्यासोबत पनवेलच्या फार्म हाऊसवर आहे. अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर याचा खुलासा झाला आहे. अशात आता इंग्रजी वेबसाईटसोबत बोलताना युलिया वंतूरनं तिच्या आणि सलमान खानच्या लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

युलिया जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की, सलमान खानसोबत केव्हा लग्न करणार आहेस तेव्हा याला उत्तर देताना युलिया म्हणाली, “मला हाच प्रश्न वारंवार विचारला जात आहे. मला हा प्रश्न विचारणंच निरर्थक आहे. कारण या सगळ्यापेक्षा हे जास्त महत्त्वाचं आहे की, दोन माणसं एकमेकांप्रति काय फील करतात. मला वाटतं की, कागदांपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे सोबत वेळ घालवणं.”

पुढे बोलताना युलिया म्हणाली, “एक वेळ तर अशी आली होती की, मी जिथे कुठे जाईल तिथं सगळीकडे आणि प्रत्येक मुलाखतीत मला हाच प्रश्न विचारला जात होता की, मी लग्न कधी करणार आहे. माझे आई वडिलही मला हाच प्रश्न विचारत होते. मी त्यांनाही विचारलं की, तुम्हाला मला खुश पहायचं आहे की, लग्न झालेलं पाहायचं आहे. तुम्हाला माहिती आहे का, ही शेवटची वेळ होती जेव्हा त्यांनी मला माझ्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला होता.”

https://www.instagram.com/p/BLs-C3ZA7tk/

https://www.instagram.com/p/BS98yxojT88/