सावरकर कुठं अन् हे आमदार कुठं ? शेतकर्‍यांचा प्रश्न महत्वाचा, राजकारण नको

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्यावरून गोंधळ निर्माण झाला. भाजप आमदारांनी ‘मी सावरकर’ असं लिहिलेल्या भगव्या टोप्या परिधान करून सरकारचा निषेध नोंदवला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात आम्ही सभागृहात काढलेले गौरवोद्गार आज विधिमंडळ कामकाजातून काढून टाकले. त्यामुळे हे सभागृह भारताचे की ब्रिटिशांच्या विधानसभेचे, असा प्रश्न माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. मात्र, राहुल गांधींच्या सावरकरांवरील विधानावरून झालेल्या राजकारणावर आमदार बच्चू कडू यांनी टोकाची प्रतिक्रिया दिली आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे
सावरकर प्रश्नावरून भाजप आमदारांनी सभागृहात आणि सभागृहाबाहेर सत्ताधारी पक्षाविरुद्ध आवाज उठवला. यावर बोलताना बच्चू कडूंनी शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे असल्याचे सांगितले. सध्या शेतकऱ्यांचा मुद्दा महत्त्वाचा आहे, पक्ष कुठलाही असू द्या, भावनेचं धर्माचं राजकारण करून मतं अधिक पेटीत कसे पक्के होतील, हा खेळ सर्वच पक्षांकडून सुरु आहे. हा खेळ थांबला पाहिजे. मुळात जिथं मरण अटळ आहे, ते मुद्दे समोर घेऊन काम करणे गरजेचं आहे, असे बच्चू कडू म्हणले.

लाज-लज्जा ठेवायला नको का ?
सावरकर कुठं आणि हे भाजपचे आमदार कुठं. ‘मी सावरकर’ लिहिताना थोडी लाज-लज्जा ठेवायला नको का ? असा प्रश्नही बच्चू कडूंनी उपस्थित केला आहे. दरम्यान, बच्चू कडू हे अपक्ष आमदार आहेत. त्यामुळे ते वाट्टेल ते बोलतात. बच्चू कडू हे रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे व्यक्ती आहेत, असा टोला भाजप आमदार संजय कुटे यांनी बच्चू कडूंना लगावला आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/