‘कहा गये उने धुंडो?’ Corona काळात भूमिगत असलेल्या बॉलीवूड स्टार्संना NCP च्या बाबासाहेब पाटील यांचा संतप्त सवाल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आपल्या सर्वांना आठवत असेल आमिर खान यां चा सुपरहिट सिनेमा थ्री इडियट मधील एक लोकप्रिय गीत “उडती पतंग सा था वो! कहा गया उसे ढूंढो”? त्याच गीतातील बोला प्रमाणे जवळजवळ सर्व सुपरस्टार करोना महामहारीत एकदम गायब झाली आहेत.ज्या महाराष्ट्र राज्याने व येथील जनतेने बॉलिवूड च्या कलावंतांना रातोरात स्टार केले त्या सर्व रसिक प्रेक्षकणा संकटकाळात कुठलीही मदत न करता काही स्टार मंडळी सुटी साजरी करण्यासाठी विविध देश्या कडे पलायन करत आहेत ही बाब खूप लाजिरवाणी असल्याचे मत बाबासाहेब पाटील प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट व सांस्कृतिक विभाग यांनी व्यक्त केलं.

सगळे सुपरस्टार.. त्यांचं कुटुंब.. त्यांचे मित्र.. इंडस्ट्रीमधलेच त्यांचे नातेवाईक ही सगळी मंडळी त्यात येतात. बॉलिवूडमध्ये सध्या ट्रेंड आहे तो मालदिवला जायचा. तिथे सुट्टी एन्जॉय करायला जायचं आणि तिथले फोटो सोशल मिडियावर टाकायचे आणि भरपूर हिट्स मिळवायचे. हे असं एकानं केलं की सगळी मंडळी एकापाठोपाठ तसंच करू लागतात.व इतक्या कठीण परिस्तिथी एक प्रकारे आपल्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार ते करत आहेत. समाजाची स्थिती पाहता ते करणं योग्य नसलं तरी कोणी काही बोलत नाही. पण मालदिवच्या यावेळच्या ट्रिपवर एक कलाकार थेट बोलला आहे, त्याचं नाव आहे नवाजुद्दिन सिद्दीकी. त्याच कौतुक सुद्धा बाबासाहेब पाटील यांनी यावेळी केलय. गेल्या काही दिवसांत अनेक कलाकार विदेशात गेले. यात श्रद्धा कपूर, जान्हवी कपूर, दिशा पटानी, टायगर श्रॉफ, अलिया-रणबीर कपूर यांचा समावेश आहे. असे बरेच बॉलिवूड कलाकार आहेत. अश्या कठीण परिस्तिथी देश सोडून दुसऱ्या देशात ट्रिपला जात आहेत. ‘देशातली स्थिती फार खडतर आहे. कोव्हिडच्या केसेस वाढतायत. लोकांना खूप अडचणी आहेत. देशाची स्थिती अशी असताना, तुम्ही पैसे उडवताय. अरे जरा तरी लाज बाळगा. ‘तुम्ही मोज म्हणून उडवत असेलेले पैसे आज अंथरुणावर असलेल्या एखाद्या कोविड पेशंटच्या मेहनतीचे असू शकतात जे त्याने कधी तरी तुमचा सिनेमा पाहण्यासाठी तिकीट वर खर्च केलेला असेल याच सुद्धा भान असू द्या. महाराष्ट्रात सलमान खान शाहरुख खान आमिर खान अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय,कपिल शर्मा ,रोहित शेट्टी, करण जोहर, शुभाश घई, अलिया भट, दीपिका पदुकोण, रणवीर कपूर, रणवीर सिंह,ऋतिक रोशन,शिल्पा शेट्टी ,माधुरी दीक्षित मौनी रॉय, कॅटरिना कैफ यासारख्या अनेक कलावंतांना सुपरस्टार केलंआहे मात्र आज महाराष्ट्रावर इतका मोठा संकट ओढवले असताना ही सर्व स्टार मंडळी अचानक कुठे लुप्त झाली आहे हा संशोधनाचा विषय आहे.

जर थोडीतरी मानुसकी यांच्यामध्ये शिल्लक असेल तर यांनी समोर येऊन सर्वांना आवाहन करून आपापल्या परीने महाराष्ट्रातल्या आजारी लोकांना वाचवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, तुच्या सहकार्याने जर महाराष्ट्रातील काही लोकांचे प्राण वाचले तर खऱ्या अर्थाने पडद्यावर चमकणारी ही हिरो मंडळी खऱ्या आयुष्यातील हिरो असतील असं माझं मत आहे.

कोव्हिड पेशंट वाढतायत. सर्व बॉलीवूड च्या सुपरस्टार यांनी जर विचार केला तर आणि सरकारी हॉस्पिटल यांना एक-एक करोड रुपयांची आर्थिक मदत हेंटिलेटर,ऑक्‍सिजन, औषधी घेण्यासाठी जर केली तर निश्‍चितच अनेकांचे जीव वाचले जातील हे ही तितकच खर आहे त्यामुळे थोडीतरी सहानुभूती दाखवा. ‘ असे आर्त हाक बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे.