सुर्याच्या चेहर्‍यावर ‘तीळ’ कुठून आला, 100 वर्षात फक्त 13 वेळा होत ‘असं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात लोकांना एक खास खगोलीय घटना पहायला मिळाली आहे. जेव्हा सूर्यासमोरून बुध ग्रह गेला, त्यावेळी हा बुध ग्रह सुर्यावर एखाद्या तीळाप्रमाणे दिसून आला.

या खगोलीय घटनेची खास बात अशी की, अशी घटना केवळ 100 वर्षातून 13 वेळाच घडते. यावेळी सोमवारी हे दुर्मिळ दृश्य पाहण्याची संधी सर्वांना मिळाली आहे. 11.35 वाजता (जीएमटी) ही घटना सुरू झाली.

ही खगोलीय घटना जवळपास साडेपाच तास सुरु होती. आता पुढल्या वेळेस ही घटना 2032 साली पाहायला मिळू शकते.

तज्ज्ञांच्या मते, बुध ग्रह नेहमीच सुर्याभोवती फिरत असतो. परंतु कधी कधी असे होते की, बुध ग्रह सुर्य आणि पृथ्वीच्या मधून आपल्या मार्गाने जातो. जेव्हा असं होतं तेव्हा बुध ग्रह सुर्याच्या चेहऱ्यावरील एखाद्या तिळाप्रमाणे दिसतो. बुध ग्रहाचा व्यास सुर्याच्या तुलनेत फक्त 0.5 टक्के आहे.

Visit : Policenama.com 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like