‘भाईजान’ सलमानच्या शोमधून का गायब ‘बिग बॉस’ची मालकीन अमीषा पटेल ? (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस 13 मध्ये पहिल्यांदाच शो च्या मालकिनीला इंट्रोड्युस करण्यात आलं. मुंबईतील फिल्म सिटीतील या बिग बॉस हाऊसची मालकीन आहे बॉलिवूड स्टार अमीषा पटेल. पहिल्या दिवशी अमीषा घरात स्पर्धकाना टास्ट देताना दिसली होती. परंतु त्यानंतर मात्र अमीषा गायबच दिसत आहे.

कुठे बिजी आहे अमीषा पटेल ?

अमीषा पटेल किती बिजी आहे हे तिचं इंस्टाग्राम प्रोफाईल पाहून लक्षात येतं. अमीषा पटेल आपल्या सोशल मीडियावरून आपल्या अक्टिव्हिटीज  शेअर करत असते. अमीषा कधी रॅम्प वॉकवर जलवा दाखवताना दिसते तर, कधी इव्हेंट्समध्ये गेस्ट म्हणून पाचारण करताना दिसते. याशिवाय अमीषा कधी जीममध्ये तर, कध पार्टीमध्ये दिसत असते.

रविवारी अमीषा पटेलनं अर्चना कोचर साठी रॅम्प वॉक केलं. ती शो स्टॉपर होती. ग्रीन कलरच्या लेहंग्यात अमीषा खूपच ग्लॅमरस दिसत होती. अमीषानं रॅम्प वॉकचे व्हिडीओ आणि फोटो इंस्टाग्रामवरून शेअर केले आहेत.

असं म्हटलं जात आहे की आपल्या बिजी शेड्युलमुळे अमीषा बिग बॉस हाऊसमध्ये दिसणार नाही. लोकांना अपेक्षा होती की, वाईल्ड कार्ड केंटेस्टेंट्स आल्यानंतर अमीषा शोमध्ये दिसू शकते. परंतु दोन वेळा वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे, परंतु अमीषा पटेल शोमधून गायबच आहे. आता चाहत्यांना आशा आहे की, अमीषा बिग बॉस फिनालेमध्ये दिसेल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/