जेथे सत्ता तेथे विखे पाटील, राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याची टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदारकीचा आज राजीनामा दिला आहे. लवकरच ते भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. विखे यांच्या भाजपा प्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलीक यांनी टीका केली आहे. विखे पाटील हे सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. जिथे सत्ता असेल तिथे विखे पाटील कुटुंब असतेच अशी टीका मलीक यांनी केली आहे.
मलिक म्हणाले, १९९५ मध्ये राज्यात शिवसेनेची सत्ता आली होती. त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वडिलांना मंत्रीपद मिळाले होते. यानंतर युपीएचे सरकार आल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटालांना मंत्रीपद मिळाले. आता भाजपचे सरकार आल्यानंतर विखे भाजपाच्या दिशेने वळले आहेत. त्यामुळे सत्ता जिथे तिथे विखे अशी टीका त्यांनी केली.

राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव भाजपात गेले त्याचवेळी ते भाजपामध्ये गेल्यासारखे होते. प्रसिद्धीसाठी ते आपले निर्णय टप्प्या टप्प्याने जाहीर करीत आहेत असा आरोप मलिक यांनी केला आहे. विरोधीपक्ष पद गेले हे सांगण्यासाठी त्यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला असल्याची टीका मलिक यांनी केली.