फायरिंग करणारा ‘शाहरूख’ गेला कुठं ? पोलिस म्हणाले – ‘ना अटकेत ना ताब्यात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 24 फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या मौजपूर चौकात झालेल्या हिंसाचारादरम्यान पोलिस कर्मचाऱ्यावर पिस्तुल डागणारा आणि सतत गोळीबार करणारा आरोपी शाहरुख बेपत्ता आहे. शाहरुख ना घरी आहे ना पोलिस कोठडीत. त्यांनतर आता प्रश्न उपस्थित होतो कि, पोलिसांवर फायरिंग करणारा आरोपी नेमका आहे तरी कुठे ?

इतकेच नव्हे तर सुरुवातीला अशी बातमी आली होती की, दिल्ली पोलिस त्याला ताब्यात घेऊन विचारपूस करीत आहेत आणि नंतर त्याला अटक करण्यात आली आहे. परंतु दिल्ली पोलिस या गोष्टी नाकारत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस सीआरपीसीच्या कलम 82 अन्वये कोणत्याही आरोपीला 24 तासांपेक्षा जास्त काळ पोलिस कोठडीत ठेवू शकत नाही.

आरोपीला न्यायालयात हजर राहावे लागते. परंतु घटनेला 72 तासांहून अधिक काळ झाला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असतं तर त्याला कोर्टात हजर व्हावं लागलं असतं. पण पोलिसांनी शाहरुखच्या ताब्यात घेतल्याची चर्चा नाकारली आहे.