जगातील ‘तो’ क्रुर राज्यकर्ता ज्याची ‘समाधी’ आजपर्यंत नाही सापडली, 700 वर्षांपासून ‘गूढ’ गडदच

पोलीसनामा ऑनलाइन – चंगेझ खान, इतिहासाच्या पानांवर नोंदले गेलेले असे नाव आहे, जे क्वचितच कुणाला माहित नसेल. त्याच्या छळ आणि शौर्याच्या कथा जगभरात प्रसिद्ध आहेत. त्याचे सैन्य ज्या परिसरातून जात असे तेथे मागे विनाशाच्या खुणा सोडून जात असे. तो मंगोलियन शासक असला तरी तलवारीच्या धाकावर त्याने आशियातील एका मोठ्या भूभागावर हक्क प्रस्तापित केला होता. इतिहासात आतापर्यंत एवढ्या मोठ्या भूभागावर अद्यापपर्यंत कुणीही ताबा मिळवलेला नाही.

जगभरात जेवढे महाराज, सुलतान अथवा बादशहा होऊन गेले त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या समाधींच्याच्या रूपात त्यांचे अस्तित्व आहे. या समाध्या यासाठी तयार केल्या गेल्या की लोकांनी नेहमी त्यांची आठवण ठेवावी. परंतु, आश्चर्याची बाब म्हणजे चंगेझ खानाने एक विचित्र मृत्यूपत्र केले होते. त्याची इच्छा नव्हती, की त्याची कोणतीही निशाणी मृत्यूनंतर मागे रहावी. त्याने आपल्या सहकार्‍यांना आदेश दिला होता की, त्याच्या मृत्यूनंतर त्यास गुप्तस्थळी दफन करण्यात यावे. या मृत्यूपत्रानुसार त्याच्या सैनिकांनी त्याच्या मृतदेहाचे दफन करून त्याच्या कबरीवरून एक हजार घोडे असे पळविले की कोणतीही खूण शिल्लक राहणार नाही.

मंगोलियाच्या चंगेझ खानाच्या मृत्यूला आठ शतकं पूर्ण झाली आहेत. यासाठी अनेकदा शोध मोहिमा राबविण्यात आल्या पण त्याची कबर सापडली नाही. नॅशनल जियोग्राफिकने तर सॅटेलाइटद्वारे त्याच्या कबरीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यास व्हॅली ऑफ खान प्रकल्प असे नाव देण्यात आले होते.

रंजक बाब म्हणजे चंगेझ खानाची कबर शोधण्यात परदेशीतील लोकांनाही स्वारस्य आहे. मंगोलियाचे लोक चंगेझ खानाची कबर शोधण्यासाठी इच्छूक नाहीत. याचे मोठे कारण म्हणजे चंगेझ खानाची कबर शोधली तर जगाचा विनाश होईल असे त्यांना वाटते. लोकांनी याचा अनुभव घेतल्याचे त्यांचे म्हणणे असून यामुळेच त्यांच्या मनात भितीने घर केले आहे.

असे म्हटले जाते की, 1941 मध्ये जेव्हा सोव्हिएत संघात, चौदाव्या शतकातील तुर्की-मंगोलियन शासक तैमूर लंगची कबर खोदण्यात आली तेव्हा नाझी सैनिकांनी सोव्हियत यूनियनला पळवून लावले होते. यामुळे सोव्हियत संघही दुसर्‍या महायुद्धात सहभागी झाला होता. म्हणून ते चंगेझ खानाची कबर खोदण्यास इच्छूक नाहीत. काही जाणकार चंगेझ खानास मंगोलियासाठी अनुकुल मानतात. त्यांच्यानुसार चंगेझ खानाचीच इच्छा होती की त्याची आठवण कुणी काढू नये. आजही लोक त्याच्या या इच्छेचा आदर करतात. मंगोलियन लोक परंपरावादी आहेत. ते त्यांच्या वारसांचा त्यांच्या विजयाएवढाच आदर बाळगतात. आजही हे लोक स्व:ताला चंगेझ खानाचे वंशज मानतात. ते आपल्या घरात चंगेझ खानाचे छायाचित्र लावतात.

जे लोक चंगेझ खानाच्या कबरीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्यासाठी हे सोपे नव्हते. चंगेझ खानाचे छायाचित्र हे जुनी नाणी आणि व्होडकाच्या बाटल्यांवर आढळून येते. त्याची अन्य कोणतीही निशाणी नाही, ज्याची मदत होऊ शकते. मंगोलियाचा परिसर एवढा मोठा आहे की, यामध्ये ब्रिटनसारखे सात देश बसू शकतील. आता एवढ्या मोठ्या प्रदेशातून एक कबर शोधायची म्हणजे, समुद्रातून एक मासा ओळखून काढण्यासारखे आहे. त्यातच मंगोलिया हा एक मागासलेला देश आहे. अनेक भागात पक्के रस्तेही नाहीत. लोकसंख्याही खुप कमी आहे.

90 च्या दशकात जपान आणि मंगोलियाने एकत्रित चंगेझ खानाची कबर शोधण्यासाठी मोहिम सुरू केली होती, यास गुरवान गोल असे नाव देण्यात आले होते. या मोहिमेंतर्गत चंगेझ खानाचे जन्मस्थळ असलेल्या खेनती शहरातून शोधाला सुरूवात करण्यात आली, परंतु, याच वर्षी मंगोलियात लोकशाहीवादी क्रांती झाली. ज्यानंतर कम्युनिस्ट शासन नष्ट झाले आणि लोकशाही राज्य आले. नव्या सरकारने गुरवान गोल प्रकल्पही थांबवला.

मंगोलियाच्या उलानबटोर यूनिव्हर्सिटीचे डॉ. दीमाजाव एर्देनबटार 2001पासून जिंगनू राजांच्या कबरींचे उत्खनन करून त्यांच्याबाबतीत माहिती घेण्याचा प्रयत्न करत होते. जिंगनू राजा मंगोलियनांचेच पूर्वज होते. चंगेझ खानाने सुद्धा याचा उल्लेख केला होता. या राजांच्या कबरीवरूनच शोध घेतला जात आहे की, चंगेझ खानाची समाधी सुद्धा अशाच प्रकारची असू शकते. जिंगनू राजांच्या कबरी जमिनीखाली सुमारे 20 मीटर खोल एका मोठ्या खोलीत आहेत. ज्यामध्ये अनेक मौल्यवान वस्तूही ठेवण्यात आल्या आहेत. यात चिनी रथ, किमती धातू, रोमवरून आणलेल्या काचेच्या अनेक वस्तू आहेत. अशी शक्यता आहे की, चंगेझ खानाच्या कबरीतही अशाच मौल्यवान वस्तु असाव्यात ज्या त्याने आपल्या शासनकाळात जमा केल्या असतील.

डॉक्टर एर्देनबटोर यांचे म्हणणे आहे की, चंगेझ खानाच्या कबरीचा शोध लागणे अवघडच आहे. मंगोलियाच्या प्रचलित कथांनुसार चंगेझ खानाला खेनती पर्वतांमध्ये बुर्खान खालदुन नावाच्या डोंगरावर दफन करण्यात आले होते. स्थानिक कथांनुसार आपल्या शत्रूंपासून दूर राहण्यासाठी चंगेझ खान येथे लपला असावा. आणि मृत्यूनंतर त्यास येथे दफन करण्यात आले असावे. परंतु, अनेक जाणकारांच्या म्हणण्यानुसार याचे पुरावे नाहीत. उलानबटोर यूनिव्हर्सिटीमध्ये इतिहास शिकविणारे सोडनॉम सोलमॉन म्हणतात की, मंगोलियन लोक या पर्वतांना पवित्र मानतात, परंतु, याचा अर्थ असा नाही की चंगेज खानाला येथे दफन केले असावे. या पर्वतावर राजघराण्यांशिवाय अन्य कुणालाही जाण्यास परवानगी नाही. हा भाग मंगोलियन सरकारने सुरक्षित ठेवला आहे. यूनेस्कोनेही यास जागतिक वारसा म्हणून दर्जा दिला आहे, परंतु, कोणताही शोध हे सिद्ध करू शकला नाही की, येथे चंगेझ खानाची कबर आहे.

चंगेझ खान त्याकाळातील एक योद्धा होता, जुलमी राजा होता, जो तलवारीच्या बळावर सर्व जग जिंकण्याचा प्रयत्न करत होता. परंतु, मंगोलियन लोकांसाठी तो त्यांचा आदर्श आहे, ज्याने मंगोलियास पूर्व आणि पश्चिमी देशांशी जोडले. ज्याने सिल्क रोडची भरभराटीची संधी दिली. त्याने मंगोलियाच्या लोकांना धार्मिक स्वातंत्र्य दिले. त्याच्या काळात मंगोलियन लोकांनी कागदी चलन सुरू केले. डाक सेवेची सुरूवात केली. चंगेझ खानाने मंगोलियास सभ्य समाज बनविले.

मंगोलियाचे लोक चंगेझ खानाचे नाव आदराने घेतात. त्यांच्यानुसार जर चंगेझ खानाची इच्छी असती की लोकांनी त्याची आठवण काढावी तर त्याने कोणतेही मृत्यूपत्र केले नसते. त्याची इच्छा असती तर त्याने एखादी निशाणी नक्की मागे ठेवली असती. यामुळेच मंगोलियन लोक त्याच्या कबरीचा शोध घेण्यास इच्छूक नाहीत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/