U – 19 World Cup जिंकणार्‍या विराट कोहलीच्या टीममधील इतर खेळाडूंचं सध्या काय चालंय, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याचा आज 31 वा वाढदिवस असून त्याच्या कारकिर्दीत 2008 U-19 वर्ल्डकप महत्वाचा भाग आहे. या स्पर्धेत त्याने सर्वाधिक धावा करतानाच भारताला या स्पर्धचे विजेतेपद देखील पटकावून दिले होते. त्यानंतर त्याला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर त्याने अनेक पराक्रम करत भारतीय संघात आपले स्थान पक्के केले. मात्र त्याच्याबरोबर या स्पर्धेत खेळलेल्या इतर खेळाडूंना मात्र हवी तशी कामगिरी करता न आल्याने त्यांना भारतीय संघात स्थान पटकावता आले नाही. आपण या खेळाडूंविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

1)श्रीवत्स गोस्वामी
2008 च्या U-19 वर्ल्डकपमध्ये 152 धावा पटकावलेल्या या खेळाडूने आयपीएलमध्ये अनेक संघात चांगले प्रदर्शन केले असून भारतीय संघात मात्र त्याला जागा पटकावत आलेली नाही. कोलकाता नाइट राइडर्स, राजस्थान रॉयल्स, सनराइजर्स हैदराबाद आणि आरसीबीकडून तो खेळला असून स्थानिक क्रिकेटमध्ये तो पश्चिम बंगालचे प्रतिनिधित्व करतो .

2)तरुवर कोहली
तरुवर कोहली आयपीएलच्या पहिल्या सत्रामध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळला असून दुसऱ्या पर्वात त्याला पंजाब खरेदी केले होते. स्तहनिक क्रिकेटमध्ये तो पंजाबचे प्रतिनिधित्व करत असून 2018-19 मधील विजय हजारे ट्रॉफीमध्ये मात्र त्याने मिझोरामचे प्रतिनिधित्व केले.

3)मनीष पांडे
2008 च्या U-19 स्पर्धेत त्याने काही खास कामगिरी केली नव्हती, मात्र तरीदेखील त्याने आतापर्यंत भारतीय संघासाठी 23 वनडे आणि 31 टी-20 सामने खेळले असून आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत विविध संघाकडून खेळताना उत्तम कामगिरी केली आहे. त्याने आयपीएलमध्ये कोलकाता नाइट राइडर्स, मुंबई इंडियंस, पुणे वारियर्स, आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबादसाठी खेळले आहे.

4)अभिनव मुकुंद
स्थानिक क्रिकेटमध्ये मोठे नाव असलेल्या अभिनव मुकुंद याला भारतीय संघात मात्र स्थान मिळवता आले नाही. २०११ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघामध्ये त्याचा समावेश होता. तसेच 2017 मध्ये देखील त्याने भारतीय संघासाठी कसोटी सामने खेळले आहेत.

5)तन्मय श्रीवास्तव
वर्ल्डकपच्या आधी तन्मयकडून कर्णधारपद विराट कोहली याला देण्यात आले होते. त्याने या स्पर्धेत 262 धावा केल्या होत्या.सध्या तो उत्तरप्रदेशचे प्रतिनिधित्व करत आहे.

6)सौरभ तिवारी
आपल्या लांब केसांसाठी ओळखला जाणारा सौरभ तिवारी याने भारतीय संघासाठी तीन एकदिवसीय सामने खेळले असून आयपीएलमध्ये देखील विविध संघांसाठी तो खेळला आहे. आरसीबी, दिल्ली डेअरडेव्हिल्स, मुंबई इंडियन्स या संघासाठी त्याने आयपीएलमध्ये खेळले असून सध्या तो स्थानिक स्पर्धांमध्ये झारखंडचे प्रतिनिधित्व करतो.

7)रवींद्र जडेजा
भारतीय संघासाठी 46 टेस्ट, 156 वनडे आणि 44 टी-20 सामने खेळलेला जडेजा भारतीय संघाचा सध्या प्रमुख सदस्य आहे. आयपीएलमध्ये देखील तो अर्मूख खेळाडू असून चेन्नई सुपर किंग्स, गुजरात लायंस, कोच्चि टस्कर्स आणि राजस्थान रॉयल्स सारख्या संघाकडून तो खेळला आहे.

8)इकबाल अब्दुल्ला
अब्दुल्ला भारतातील सर्वश्रेष्ठ गोलंदाज असून स्थानिक स्पर्धांमध्ये तो मुंबईसाठी क्रिकेट खेळतो. मात्र त्याला भारतीय संघात स्थान मिळवण्यास यश आलेले नाही.

9)सिद्धार्थ कौल
भारतासाठी 3 एकदिवसीय आणि 2 टी-20 खेळलेला पंजाबचा हा गोलंदाज अद्यापही भारतीय संघात आपि जागा पक्की करण्यासाठी धडपडत आहे. आयपीएलमध्ये देखील तो विविध संघांसाठी खेळला असून दिल्ली डेयरडेविल्स, कोलकाता नाइट राइडर्स, किंग्स इलेवन पंजाब आणि सनराइजर्स हैदराबाद या संघांकडून तो आयपीएलमध्ये खेळला आहे.

10)अजितेश अर्गल
पाच षटकांत सात धावा देत २ बळी घेणाऱ्या अजितेश याला फायनलमध्ये सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता. मात्र सध्या तो क्रिकेट खेळत नसून बडोदामधील आयकर विभागात आयकर निरीक्षक म्हणून तो सध्या काम करत आहे.

11)प्रदीप सांगवान
विराटच्या संघात वेगवान गोलंदाज म्हणून खेळलेल्या या गोलंदाजाला देखील भारतीय संघात स्थान मिळ्वण्यास अपयश आले. आयपीएलमध्ये मात्र तो मुंबई इंडियन्स, कोलकाता नाहीय रायडर्स, दिल्ली आणि गुजरातकडून खेळला आहे.

12)दुवारवपु शिव कुमार
दुवारवपु शिव कुमार हा एक अष्टपैलू गोलंदाज असून स्थानिक स्पर्धांमध्ये तो आंध्रप्रदेशचे प्रतिनिधित्व करतो. 42 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याने आतापर्यंत 133 विकेट घेतल्या आहेत.

13)नेपोलियन आइंस्टीन
नेपोलियन आइंस्टीन याला चेन्नईने 2008 च्या स्पर्धेत आपल्या संघात स्थान दिले होते. मात्र आता त्याने क्रिकेट सोडले असून त्याच्याबद्दल जास्त काहीही माहिती उपलब्ध नाही.

14)पेरी गोयल
गोयल याला या वर्ल्डकप स्पर्धेत एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर मात्र त्याने अभ्यासासाठी क्रिकेटला रामराम ठोकला. सध्या तो एका कंपनीत निर्देशक आहे.

Visit : Policenama.com

Loading...
You might also like