जिथे बदल हवा असेल तिथे महिला खंबीर उभी असेल, न्याय हक्कासाठी सतत धडपडणाऱ्या पत्रकाराच्या मुलींनी घेतली अध्यक्षपदाची धुरा

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन – मुरबाडमध्ये विकासाच्या नावाने शेकडो नारळ फुटले असून, विकास मात्र हरवला आहे. त्याचाच शोध घेण्यासाठी मुरबाडमधील नवतरुणी रणांगणात उतरल्या असून, अत्ता बदल घडलाच पाहिजे, खोट्या भूल थापा बास झाल्या, याच पार्श्वभूमीवर पत्रकार श्याम राऊत यांची कन्या प्रियंका श्याम राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महिला युवती मुरबाड तालुका अध्यक्षपदाची धुरा हाती घेतली आहे.

मुरबाड तालुक्यात आगामी नगरपंचायत व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपले उमेदवार विजयी करण्यासाठी कंबर कसली आहे. रविवारी राष्ट्रवादीमध्ये अनेक महिला कार्यकर्त्यांनी प्रवेश केला असून, महिलांकडून पक्ष संघटना बांधण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. या नवनियुक्तीमध्ये दैनिक लोकमत या वर्तमानपत्राचे झुंजार पत्रकार श्याम राऊत यांची कन्या प्रियंका हिची राष्ट्रवादी काँग्रेस महिला युवती मुरबाड तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे प्रियंका हिच्यावर तालुक्यातील सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुरबाड येथील मध्यवर्ती कार्यालयात पार्टीचे ज्येष्ठ नेते प्रमोद हिंदुराव यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिला कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुरबाड तालुका महिला उपाध्यक्षपदी न्ह्यावे गावाच्या सरपंच सौ. पुष्पाताई सोनटक्के, सौ. सरीता ताई सुधाकर यशवंतराव, सौ. सुजाताताई राजेंद्र हिंदुराव, सौ. शुभांगीताई रांजणे तर राष्ट्रवादी काँग्रेस युवती तालुका अध्यक्षपदी प्रियंका श्याम राऊत यांची नियुक्ती करण्यात आली.

या महिला आघाडीच्या पदनियुक्ती कार्यक्रमाला ठाणे जिल्हा राष्ट्रवादी महिला उपाध्यक्षा सौ. अपर्णाताई पवार-भोईर, मुरबाड तालुका महिला अध्यक्षा सौ. सुवर्णाताई भावार्थे, मुरबाड शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष दीपक वाघचौडे, सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष नामदेव गायकवाड, तालुका उपाध्यक्ष विलास भावार्थे, तालुका युवक कार्याध्यक्ष हर्षद शेळके, उपाध्यक्ष हर्षराज झुंजारराव,अविनाश भोईर, दीपक भावार्थे, प्रशांत पवार व अन्य पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You might also like