Where To Invest | तरुण गुंतवणूकदारांची सर्वात मोठी समस्या: पैसे तर वाचवले, पण गुंतवणूक कुठे करावी?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Where To Invest | पैसे वाचवले पण ते कुठे गुंतवायचे हे माहित नाही ? ही समस्या तरुण गुंतवणूकदारांना सतावत आहे. डिनेरो निओ बँकेने (Dinero Neo Bank) त्यांच्या एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे कि 19-30 वयोगटातील 500 सहभागींपैकी निम्म्याहून अधिक (64 टक्के) म्हणाले की त्यांना कुठे गुंतवणूक करावी (Where To Invest) हेच माहित नाही.

 

या वयोगटातील गुंतवणूकदारांची विचारप्रक्रिया (Thought Process) समजून घेणे हा या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश होता. पैसे वाचवताना ते त्यांचे आर्थिक उद्दिष्ट (Financial objectives) कसे ठरवतात हे पाहायचे होते.

 

500 सहभागी पैकी, 51 टक्क्यांहून अधिक प्रतिसादकर्त्यांनी सांगितले की ते मासिक उत्पन्नातून पैसे वाचवतात आणि बाजूला ठेवतात, परंतु ते त्यांच्या गुंतवणूक योजनांवर कार्य करू शकत नाहीत. कारण त्यांच्याकडे आवश्यक ज्ञानाचा (Required knowledge) अभाव आहे. गुंतागुंतीच्या आर्थिक अटी त्यांना गोंधळात टाकतात त्यामुळे त्यांना निर्णय (Where To Invest) घेता येत नाही असे वाटते.

शॉर्ट टर्म खर्चासाठी सेविंग
या सर्वेक्षणात असे आढळून आले की, ध्येयाशिवाय बचत करणे हा आणखी एक अडथळा आहे. एक तृतीयांश पेक्षा जास्त प्रतिसादकर्त्यांनी (33 टक्के) स्पष्ट उद्दिष्ट ठेवल्याशिवाय कोणतीही रक्कम वाचवण्याकडे त्यांचा कल नसल्याचे सांगितले. तथापि, 40 टक्के बचतकर्त्यांनी सांगितले की, ते त्यांच्या शॉर्ट टर्म खर्चासाठी बचत करतात.

 

कमी जोखमीच्या गुंतवणुकीचे पर्याय देणारी विश्वसनीय आर्थिक मालमत्ता शोधण्यात सक्षम नसल्यामुळे आवश्यक ज्ञानाची कमी आणखी वाढते.
उत्तरदात्यांपैकी एक तृतीयांश पेक्षा जास्त, 35 टक्के लोकांनी सांगितले की, त्यांना योग्य मालमत्ता शोधण्यात अडचण आली.

 

क्रिप्टोकरन्सी (cryptocurrency) ही पहिली पसंती नाही
निवडीचा प्रश्न येतो तेव्हा, क्रिप्टोकरन्सी लोकप्रियतेमध्ये म्युच्युअल फंडाच्या मागे असतात.
विशेष म्हणजे, 59 टक्के सहभागींनी सांगितले की, ते ट्रेंडिंग क्रिप्टोकरन्सीपेक्षा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतील.
जवळपास अर्ध्या (45 टक्के) लोकांनी एकाधिक UPI ॲप्स वापरून केलेल्या खर्चाला ट्रॅक करण्याऐवजी त्यांच्या खर्चावर नजर ठेवण्यासाठी प्राथमिक स्वरूपाचे त्यांचे बँक स्टेटमेंट वापरल्याचे मान्य केले.

 

डिजीटायझेशन (digitalization) नक्कीच वाढले आहे, परंतु तरुण गुंतवणूकदार अजूनही एखाद्या व्यक्तीकडे गुंतवणूक करताना सल्ला किंवा सहाय्य मिळविण्यासाठी वळतात.

 

Web Title :-  Where To Invest | young investors have money but do not know where to invest

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा