तेव्हा सुशांत कुठे होता ? PM मोदींसोबतच्या ‘त्या’ भेटीवरून महिला भाजप खासदाराचा बॉलिवूड कलाकारांना सवाल !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला एक महिना झाला आहे. अजूनही त्याच्या निधनाबद्दल असणाऱ्या निरनिराळ्या चर्चा सुरू आहेत. काही लोक आहेत जे या घटनेला आत्महत्या मानायला तयारच नाहीत. अनेक लोक असे आहेत जे अद्यापही CBI चौकशीची मागणी करत आहेत. यात आता आणखी एक नाव अॅड झालं आहे ते नाव म्हणजे महाभारत मालिकेत द्रौपदीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रूपा गांगुली आहे. अभिनेत्री आणि भाजप खासदार रूपा गांगुली यांनी काही ट्विट केले करत काही सवाल उपस्थित केले आहेत.

काही दिवसांपूर्वीच करण जोहरच्या चार्डर्ट विमानानं काही बॉलिवूड स्टार पीएम मोदींना भेटायला आले होते. यात सुशांत होता का असा सवाल त्यांनी करण जोहरला केला आहे.

आणखी एका ट्विटमध्ये रूपा यांनी लिहिलं की, “डिसेंबर 2018 ते जानेवारी 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बॉलिवूड कलाकारांना कितीदा भेटले. यात सुशांत होता का ?” असा सवाल केला आहे.

रूपा यांनी आणखी काही सवाल केले आहेत. बॉलिवूड कलाकारांच्या या भेटीचं नियोजन कोणी केलं होतं? संपर्क कोणी साधला होता ? पंतप्रधानांना भेटण्याची एक पद्धत असते. प्रोटोकॉल असतो. अशात सुशांतसारख्या प्रतिभावान कलाकाराला का टाळण्यात आले. ही यादी कोणी बनवली होती असंही त्या म्हणाल्या आहेत.

रूपा यांनी पीएम मोदींच्या शपथविधी कार्यक्रमातील फोटोही शेअर केला आहे. यात सुशांत कपिल शर्मा, करण जोहरच्या यांच्यामध्ये बसलेला दिसत आहे. यात तर सुशांत होता मग त्या भेटीवेळीच का नव्हता आणि तर तो पंतप्रधानांना भेटलाय तर त्याचा मोदींसोबत एकही फोटो काही नाही ? असा सवालही त्यांनी केला आहे.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like