६० वर्षात सिंचनाचा पैसा कुठे गेला : राज ठाकरे

पुणे :  पोलीसनामा  ऑनलाईन

गेल्या ६० वर्षामध्ये सिंचनाचा पैसा पाटबंधारे विभागात मुरला नसता तर गावे पाणीदार झाली असती असे मत करत राज ठाकरे यांनी इतक्या वर्षातील सिंचनाचा पैसा कुठे गेला असा सवाल मुख्यमंत्री आणि अजित पवार यांना विचारला. पाणी फाऊंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धेचा निकाल आज जाहिर करण्यात येणार आहे. त्यानिमित्त पुण्यात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यावेळी राज ठाकरे आपल्या शैलीत बोलत होते.
[amazon_link asins=’B01951R2S2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6a5fa192-9e29-11e8-8ea4-554af7300267′]

या कार्य़क्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, अशोक चव्हाण यांच्यासह अनेक नेते  उपस्थित आहेत. सिंचनाच्या प्रश्नावरुन राज ठाकरे यांनी सरकारच्या कानपिचक्या घेतल्या. राज ठाकरे यांनी आपल्या पाच मिनीटाच्या भाषणात सद्याच्या आणि मागिल सरकारला सिंचनाचा पैसा कोठे मुरला असा सवाल केला. त्यावेळी आपल्या भाषणात ते म्हणाले सध्या या ठिकाणी मागील सरकार आणि आत्ताचे सरकार उपस्थित आहे. त्यांनी याचे उत्तर द्यावे.

खासगी संस्थां, सामाजीक संस्थांकडून जलसिंचनाची कामे केली जातात. या कामांमध्ये सरकारी अधिकारी कर्मचारी काम करतात. मग सरकारी कामात हे अधीकारी कर्मचारी काम का करत नाहीत असादेखील सवाल त्यांनी उपस्थित केला. अमिरने हा पुरस्कार घ्यावा

अमिर खान याचे कौतुक करताना राज ठाकरे म्हणाले, अमिर खान याने आत्तापर्य़ंत एकही पुरस्कार स्विकराला नाही. परंतु त्याने मॅगेसेज पुरस्कार आवश्य घ्यावा.
[amazon_link asins=’B01MU4PM6P’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6f7ab36f-9e29-11e8-86a9-5704583e1507′]कुदळ मारायला जमते

या कार्यक्रमाला आलेल्या नागरिकांनी पुढील वर्षी श्रमदान करण्यासाठी येण्याची विनंती राज ठाकरे यांना केली. नागरिकांनी केलेल्या या विनंतीला मान देत राज ठाकरे यांनी पुढील वर्षी श्रमदान करण्यासाठी येण्याचे आश्वासन दिले. त्यावेळी ते म्हणाले की, मला कुदळ मारायला जमते कुदळ कोठे आणि कशी मारायची हे माहित आहे. पण फावडे कसे चालवायचे ते तुम्ही मला शिकवा.