Aadhaar सोबतचा रजिस्टर्ड मोबाइल नंबर विसरलात का? 2 मिनिटात ‘या’ पद्धतीने जाणून घ्या, ‘ही’ आहे पूर्ण प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्त संस्था – अनेक लोक आधार रजिस्ट्रेशन करताना दिलेला मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी विसरतात. आधार नंबर मोबाईलशी लिंक केलेला असतो, ज्याद्वारे तुमच्यापर्यंत सहज पोहचता येते आणि आधारशी संबंधीत अनेक ओटीपी, एसएमएस अलर्ट सुद्धा त्याच रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर येतात. अशावेळी तो नंबर आठवला नाही तर अडचणी येऊ शकतात. हा नंबर जाणून घेण्याची पद्धत…

असा चेक करा मोबाईल नंबर
– सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट www.uidai.gov.in वर जा.
– आता माय आधार टॅबमध्ये व्हेरिफाय ईमेल/मोबाईल नंबर ऑपशन सिलेक्ट करा.
– यानंतर सिस्टमवर एक नवीन पेज उघडेल. येथे आधार नंबर, मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी एंटर करा. यामध्ये तुम्ही तोच मोबाईल नंबर आणि आयडी टाका जो व्हेरिफाय करायचा आहे.
– यानंतर कॅप्चा कोड एंटर करून सेंड ओटीपीवर क्लिक करा.
– मोबाईल नंबर टाकला असेल तर त्यावर ओटीपी येईल, जर ईमेल आयडी टाकला असेल तर मेलवर ओटीपी येईल.
– आता दिलेल्या स्पेसमध्ये आलेला ओटीपी एंटर करा.

यानंतर जर दिलेला मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी युआयडीएआयच्या रेकॉडप्रमाणे असेल तर स्क्रीनवर मेसेज येईल की, तुम्ही दिलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी रेकॉर्डप्रमाणे आहे. जर इतर मोबाईल नंबर/ईमेल रजिस्टर्ड असेल तर व्हेरिफिकेशन प्रोसेसमध्ये टाकलेला मोबाईल नंबर/ईमेल मॅच होत नसल्याचा मेसेज येईल. यावरून तुम्हाला समजेल की, आपण कोणता मोबाईल नंबर/ईमेल आधार नंबर बनवताना दिला आहे.