लातूर : 8 हजारांची लाच घेताना सहायक अधीक्षक ACB च्या जाळ्यात

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – आठ हजारांची लाच घेताना लातूरच्या जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील सहायक अधीक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि. 8) सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे. याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अभिमन्यू धाेंडिबा सुरवसे ( वय 51 रा. नाथनगर, लातूर ) असे अटक केलेल्या सहायक अधीक्षकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने तक्रारादाराच्या आई-वडिलांचे उपाचाराचे 3 लाख 12 हजार 564 रुपयांचे वैद्यकीय बिलाची मंजूरी करून करून देतो, असे म्हणून बीलाच्या 3 टक्के प्रमाणे शासकीय शुल्क ऑनलाईन भरावे लागेल व शासकीय शुल्काव्यतिरिक्त बीलाच्या 5 टक्के प्रमाणे लाचेची मागणी केली होती. दरम्यान तडजाेडीअंती 8 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लातूर येथील एसीबीकडे तक्रार केली होती.

तक्रारीची शहनिशा केल्यानंतर एसीबीच्या पथकाने गुरुवारी दुपारी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात सापळा लावला. यावेळी तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारतांना एसीबीच्या पथकाने आरोपीला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी एमआयडीसी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचे एसीबीचे उपाधीक्षक माणिक बेद्रे यांनी सांगितले.