स्टीम बाथ घेताना पालिकेच्या मुख्य लेखापरिक्षकांचा मृत्यू 

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

स्टीम बाथ घेत असताना महापालिकेचे मुख्य लेखा परिक्षक संजय बुवागिरी गोसावी (वय-५४) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज (रविवार) अमराई क्‍लबमध्ये रात्री आठच्या सुमारास घडली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’39a92692-c4c8-11e8-aa69-e9eb72e063e2′]

संजय गोसावी हे यापूर्वी महापालिकेत मुख्य लेखा परिक्षक म्हणून कार्यरत होते. मात्र, २००९ मध्ये त्यांची बदली करण्यात आली. त्यानंतर पुन्हा २०१६ मध्ये महापालिकेत मुख्य लेखा परिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ते येथील अमराई क्‍लबमध्ये स्टीम बाथ घेण्यासाठी जात होते. आजही सायंकाळी साडेसातच्या सुमारास ते गेले होते. त्यात गुदमरून ते अस्वस्थ झाले. त्यानंतर तातडीने त्यांना रूग्णालयात हलवण्यात आले. परंतू त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

[amazon_link asins=’B009ZBCZWQ,B00B4BBF94′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5023d9da-c4c8-11e8-aa46-b9ae1d8a4002′]

उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, मुख्य लेखापरिक्षकांचा मृत्यू झाल्याचे समजताच पालिकेचे अधिकारी-कर्मचारी, नगरसेवकांनी रूग्णालय परिसरात गर्दी केली होती. पालिकेच्या अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात होती.
वाढता लठ्ठपणा दूर होण्यासाठी चळवळ हवी : डॉ. जयश्री तोडकर

स्टीम बाथ म्हणजे काय..? 

जीममध्ये व्यायामासाठी जाणाऱ्यांना हा स्टीम बाथचा प्रकार केला जातो. पूर्ण शरिराला वाफेच्या सहाय्याने आंधोळ घातली जाते. तो प्रकार घेण्यासाठी ते अमराई क्‍लबच्या जीममध्ये जात होते.
जाहिरात.