Video : ‘महाविकास’ सरकारमधील नेत्यांवर भडकले फडणवीस, म्हणाले – ‘ओबीसी आरक्षणाचा मुडदा पडत असताना मंत्री मोर्चे काढत होते’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने OBC समाजाचे राजकीय आरक्षण Reservations संपुष्ठात आले, याला जबाबदार भाजप आहे. न्यायालयाने सतत सांगून देखील केंद्राने OBC ची जनगणना करून संख्या दिली नाही. म्हणून कोर्टाने हे आरक्षण Reservations रद्द केलं. असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. काहीही झालं की केंद्र आणि मागचं सरकार एवढंच या सरकारला येतं असा फडणवीस यांनी म्हटलं आहे. यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयाचा आदेशच वाचून दाखवत, OBC चा मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. तर OBC आरक्षणाचा मुडदा पडत होता, तेव्हा मंत्री मोर्चे काढत होते. असा हल्लबोलही फडणवीस यांनी केला आहे. राज्याने मागासवर्गीय आयोग स्थापन करुन, डेटा जमा करतोय, असे सांगितले असते तरी हा निर्णय टळला असता. परंतु, मागील १५ महिन्यांपासून राज्य सरकार गप्प बसलंय. मागासवर्गीय आयोग गठीत करण्याचं सोडून काही मंत्री फक्त मोर्चे काढत बसले होते, असा घणाघात देखील फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारधील नेत्यांवर केला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत OBC आरक्षणाअंतर्गत राखीव जागांच्यासंदर्भात राज्य सरकारची फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्याने फक्त आणि फक्त महाविकास आघाडी सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आणि नाकर्तेपणामुळे अखेर OBC चे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. मा. सुप्रीम कोर्टात याबाबत सुनावणी सुरू असताना १५ महिन्यांमध्ये किमान ८ वेळा सरकारने केवळ तारखा मागितल्या. कोर्टाने एका निर्णयाप्रमाणे राज्य सरकारला मागासवर्ग आयोग गठीत करून तसेच इम्पेरिकल डाटा तयार करून आरक्षणाचे जस्टीफाय करावे लागेल. परंतु, त्यानंतरही यावर कोणतीही कारवाई राज्य सरकारच्या वतीने केली गेली नाही. असे फडणवीस म्हणाले.

काय म्हणाले होते नाना पटोले ?
घटनेच्या कलम ३४० नुसार इतर मागास वर्गाला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अधिकार मिळाले आहेत. परत्नू, केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून जाणीवपूर्वक OBC वर अन्याय केला जात आहे. यामधील वस्तुस्थिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना माहित आहे. परंतु ते जाणीवपूर्क खोटे बोलून दिशाभूल करत असून त्यांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असं म्हणत पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली.