‘रामायण’मधील एक सीन शुट करताना भाजले होते ‘मंथरा’ ललिता पवार यांचे दोन्ही पाय, कुणालाही कळू न देता पूर्ण केलं ‘शुटींग’ !


पोलिसनामा ऑनलाइन –
अनेक दशकं सिनेमात काम करणाऱ्या दिग्गज अभिनेत्री ललिता पवार यांनी रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेत मंथराची भूमिका साकराली होती. जेव्हापासून रामायण या मालिकेचं रिपीट टेलीकास्ट सुरू आहे तेव्हपासून मालिकेसंदर्भात अनेक किस्से समोर येताना दिसतात. असाच एक किस्सा समोर आला आहे.

रामायणचे लक्ष्मण सुनील लहरी गेल्या काही दिवसांपासून अनेक न ऐकलेले किस्से सांगत आहेत. आता त्यांनी ललिता पवार यांचा एक किस्सा शेअर केला आहे जो चर्चेत आला आहे.

https://www.instagram.com/p/B_PFmTPJkzZ/

एका मुलाखतीत बोलताना सुनील लहरी म्हणाले, “भगवान रामाचा अयोध्येला आल्याचा सीन शुट करत होतो त्याचवेळी ललिता पवार यांच्या पायाला इजा झाली. गंभीर इजा झाल्यानंतरही त्यांनी शुटींग पूर्ण केली.”

लहरी म्हणाले, “एक सीन असा होत जेव्हा भगवान राम अयोध्येला येत असतात तेव्हा सेटवर दिवे लावले जातात. ललिला जी खूप उत्साहात तो सीन शुट करत होत्या. त्यांनी चुकून लालटेनवर पाय ठेवला. यामुळं त्यांचे दोन्ही पाय भाजले होते. असं झालं तरीही त्यांनी आराम न करताच शुटींग केलं होतं.

लहरी सांगतात उपचारासाठी त्यांना एका खोलीत नेण्याआधीच त्यांनी शॉट पूर्ण दिला होता. त्यांना कामाची खूपच ओढ होती. त्यांना आराम करण्यासाठी सांगण्यात आलं होतं. त्यांना जखम झाली हे त्यांनी कुणाला कळूच दिलं नाही.