रांगेत उभा न राहता घर बसल्या जवळच्या 10KM पर्यंतच्या ATM सेंटरमध्ये ‘कॅश’ आहे की नाही, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजच्या डिजिटल युगात नागरिकांनी स्वतःजवळ रोख रक्कम ठेवणे बंद केले आहे. त्यामुळे नागरिकांना पैश्यासाठी मोठ्या प्रमाणात एटीएमवर निर्भर राहावे लागत आहे. मात्र यासाठी अनेकवेळा मोठ्या आणि लांब रांगेत उभे राहावे लागते. तर काहीवेळा एटीएममधील पैसे संपल्याने नाहक त्रास सहन करावा लागतो.

अशापद्धतीने समजून घ्या कोणत्या एटीएममध्ये आहेत पैसे –
युनियन बँकेने यासाठी आपल्या ग्राहकांसाठी यू-मोबाइल नावाचे ऍप आणले असून याद्वारे ग्राहकांना यामध्ये पैसे आहेत कि नाही याचा तपास करता येणार आहे. जर एटीएममध्ये पैसे असतील तर त्यावर हिरवा रंग दिसेल आणि पैसे नसतील तर लाल रंग दिसेल.

10 KM पर्यंतच्या मशीनची घ्या माहिती –
युनियन बँकेचे संपूर्ण देशभरात 7000 एटीएम आहेत. या ऍपच्या माध्यमातून तुम्ही विविध एटीएममध्ये पैसे आहेत कि नाही याची माहिती मिळवू शकता. तसेच जवळपास 10 किलोमीटर परिसरामधील एटीएमची माहिती तुम्ही यामधून मिळवू शकता.

अशाप्रकारे डाउनलोड करा ऍप –
Google Play Store वर जाऊन तुम्ही हे ऍप डाउनलोड करू शकता. तसेच बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर देखील तुम्हाला यासाठी लिंक आढळून येईल.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like