९ हजाराची लाच घेताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात

पुणे  :  पोलीसनामा ऑनलाईन

खरेदी केलेल्या जमीनीची नोंद ७/१२ उताऱ्यावर करण्यासाठी ९ हजार रुपयांची लाच स्विकारताना पुरंदर तालुक्यातील सज्जा सोनेरी गावच्या तलाठ्याला अॅन्टी करप्शनच्या पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई सासवड येथील सर्कल कार्यालयात करण्यात आली.
देवानंद उखा लोहार (वय -४९ रा. ७०/१/A बालाजी निकेतन सासायटी, फ्लॅट नं ४०३ घोरपडी बी टी कवडे रोड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. याप्रकरणी ३० वर्षीय व्यक्तीने पुणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दिली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7d063ffd-cd71-11e8-a14b-7f17d1035c9c’]

तरक्रारदार यांनी त्यांच्या आईच्या नावे सोनेरी गावच्या हद्दीत जमीन खरेदी केली आहे. तसेच सोनेरी गावात असलेल्या जमीनचे तक्रारदार आणि त्यांच्या भावामध्ये वाटप झाले आहे. वाटप पत्राची नोंद ७/१२ उताऱ्यावर करण्यासाठी तलाठी देवानंद लोहार याने १० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीमध्ये ९ हजार रुपये देण्याचे ठरले होत. याची तक्रार तक्रारदार यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली असता तलाठी लोहार याने दहा हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आज सासवड येथील सर्कल कार्यालयात सापळा रचला. लोहार याला ९ हजार रुपयांची लाच घेताना पथकाने रंगेहाथ पकडले.

[amazon_link asins=’B01E8JXLTK,B01NBX6TJJ,B00NBIM6VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8aa35a90-cd71-11e8-98c4-d3eca4ea85e2′]

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पोलीस उप अधीक्षक दत्तात्रय भापकर, पोलीस उप अधीक्षक प्रतिभा शेडगे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस उप अधीक्षक प्रतिक्षा शेडगे करित आहेत.
सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांक किंवा ७८७५३३३३३३ या व्हॉट्स अॅप नंबरवर संपर्क साधावा.

‘तितली’मुळे आंध्रात ८ ठार, ओडिशात अतिवृष्टी