मुंबई : 15 हजार रुपयांची लाच घेताना महिला पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात

मुंबईः पोलीसनामा आॅनलाईन

गुन्हा दाखल न करण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच घेतना एका महिला पोलीस शिपायास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. महिला पोलीसाला लाच घेताना पकडल्यामुळे पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे. पुष्पा कृष्णाजी देशमुख (ब. नं-1009 , नेमणूक -एनआरआय सागरी पोलीस स्टेशन) असे लाचखोर महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी 26 वर्षीय तक्रारदाराने तक्रार दिली होती.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदाराच्या विरोधात गुन्हा दाखल न करण्यासाठी महिला पोलीस कर्मचाऱ्याने 35 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर 15 हजारा रुपये देण्याचे ठरले. सदर प्रकरणी तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा केल्यानंतर सापळा लावला असता 15 हजार रुपयाची लाच घेताना या महिला पोलीस कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. सदरची कामगीरी नवीमुंबई एसीबीच्या युनिटने केली.