32 हजाराची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकला अँटी करप्शनकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे -मुंबई महामार्गावर घाट पास करुन देण्यासाठी ट्रकचालकांकडून ३२ हजार रुपयांची लाच घेताना अँटी करप्शन ब्रुरोने पहाटे पावणेचार वाजता सापळा रचून महामार्ग सुरक्षा पथकाच्या लाचखोर पीएसआयला रंगेहाथ पकडले. इतक्या पहाटे करण्यात आलेली ही देशातील पहिलीच कारवाई असावी. भरत तानु तांबीटकर (वय ५७) असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. सरकारी अधिकारी आणि कर्मचारी हे कार्यालयीन वेळेत काम करतात. जादा काम असेल तर ते नंतर थोडा वेळ थांबतात. हे लक्षात घेऊन अनेक लाचखोर सकाळी लवकर अथवा रात्री उशिरा लाच घेताना दिसू लागले होते. त्यांच्यावर वचक बसविण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने उशिरापर्यंत कारवाया सुरु केले. मात्र, पुणे -मुंबई महामार्गावर आज पहाटे सापळा रचून कारवाई करण्यात आली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’15fea1e5-c3a1-11e8-987b-03c6981efce8′]

तक्रारदार हे मुळचे ठाण्याचे असून त्यांचा ट्रक आणि ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. पोलीस उपनिरीक्षक भरत तांबीटकर याने खंडाळा घाटातून ट्रेलर पास करुन देण्यासाठी व ट्रकवर कारवाई करु नये, यासाठी ३२ हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदारांनी त्याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यांनी तातडीने पुण्यातून रात्रीच पथके खंडाळा येथे रवाना केली. त्यांनी या तक्रारदाराची भेट घेतली. त्यानंतर तेथेच रस्त्यावर त्यांच्या तक्रारीची पडताळणी केली.

शिवरायांच्या पुतळयाच्या खांद्यावर हात ठेवून भाजप मंत्र्याने काढला फोटो

त्यानंतर खंडाळा आणि लोणावळा दरम्यान सापळा रचण्यात आला. फोनवर बोलणे झाल्यानुसार भरत तांबीटकर हा पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी तेथे पैसे घेण्यासाठी आला. तक्रारदाराकडून ३२ हजार रुपये लाच घेताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सुहास नाडगौंडा, पोलीस हवालदार करंदीकर, पोलीस शिपाई कृष्णा कुऱ्हे, किरण चिमटे यांनी या कारवाईत भाग घेतला.

[amazon_link asins=’B01AD36M8C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2d649e9a-c3a1-11e8-8074-b5bb7fed4b51′]

शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी केले आहे. मुंबई -पुणे महामार्गावर रात्री अपरात्री मोठ्या प्रमाणावर अवजड वाहने येत असतात. ते खंडाळा घाटातील सर्व तीनही लेन व्यापून गाड्या चालवत असतात. त्यामुळे छोट्या गाड्या, मोटारी, बस यांना जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो. महामार्ग सुरक्षा पथकाने त्यांच्यावर लेनशिस्त पाळत नसल्याबद्दल कारवाई करावी, अशी मागणी वारंवार होत असते. पण त्याकडे महामार्ग सुरक्षा पथकाकडून आजवर कायमच दुर्लक्ष करण्यात आले आहे. ट्रक, ट्रेलर, मोठे अवजड कंटेंनर यांच्यावर कारवाई का केली जात नाही याचे त्यामागील सत्य त्यांच्याकडून मिळणाऱ्या मोठ्या हप्त्यात दडले असल्याचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या आजच्या कारवाईने स्पष्ट झाले आहे.