१० हजार रुपयाची लाच घेताना पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस कर्मचारी अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – वाहन सोडवण्यासाठी दहा हजार रुपयाची लाच स्विकारताना पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याला अॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई आज (शुक्रवार) लोणी काळभोर पोलीस ठाण्यात करण्यात आली. या प्रकारामुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

लोकेश रमेश राऊत (वय-३६ रा. कैलास गरूड यांची बिल्डींग दुसरा मजला कदमवाकवस्ती लोणी काळभोर जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी २४ वर्षीय तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.

लोकेश राऊत हे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून कार्य़रत आहेत. तक्रारदार यांच्या अपघातातील गुन्ह्यामध्ये वाहनाची आरटीओ तपासणी करुन ते वाहन सोडवण्यासाठी लोकेश राऊत यांनी आज ४० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीमध्ये १० हजार रुपये देण्याचे ठरले होते. दरम्यान, याची तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागकडे केली.  पथकाने पडताळणी करुन लोणी काळभोर पोलीस ठाण्यात सापळा रचला. लोकेश राऊत यांनी पंचा समक्ष तक्रारदाराकडून १० हजार रुपयाची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक अर्चना दौंडकर, पोलीस निरीक्षक सुरेखा घार्गे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक प्रतीक्षा शेडगे करीत आहेत.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.
पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like