सॅनिटरी नॅपकिन संदर्भात ‘या’ प्रकारचा निष्काळजीपणा करत असाल तर वेळीच सावध व्हा

पोलीसनामा ऑनलाइन – हिवाळ्याच्या दिवसांमध्ये काही महिला गरम पाण्याने अंघोळ करतात. परंतु, मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी महिलांनी ५ दिवसांच्या कालावधीत गरम पाण्याने अंघोळ करायला हवी. सकाळी कामाची घाई असल्याने महिला थंड पाण्याने अंघोळ करतात. मात्र, हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

…तर बॅक्टेरिया पसरण्याचा धोका कमी होतो

अंघोळ करताना पॅड बदलण्याच्यापूर्वी आणि परत हात साबणाने स्वच्छ धुवा. असे केल्याने बॅक्टेरिया पसरण्याचा धोका कमी होती. मासिक पाळीच्यादरम्यान गरम पाण्याने अंघोळ करताना पाणी कोमट असावे जेणेकरुन त्वचेस फार नुकसान होणार नाही. गरम पाण्याने वेदनेपासून आराम भेटतो. तसेच स्नायूंची लवचीकता वाढते. अंघोळ करताना गरम पाण्यात सेंधा मीठ घातल्याने वेदना कमी होण्यास मदत मिळते व त्वचेतील रोम छिद्रांमधील घाण साफ होते. त्यानंतर शरीरावर मोहिरचे अथवा नारळाचे तेल लावा. त्याने नैसर्गिक थर निर्माण होऊन शरीर तात्काळ गरम होते.

तसेच अंघोळ झाल्यानंतर गरम पाणी किंवा ग्रीन टी घ्या. त्याने शरीर उबदार राहण्यास आणि वेदना कमी करण्यास मदत होते. या कालावधीत दुधातून बनविलेले चहा पिणे टाळावे. ब्लॅक टीची निवड करावी. सकाळी यासोबत एक किंवा दोन बिस्किटे अथवा टोस्ट खा.

स्वच्छ सॅनिटरी नॅपकिनचा वापर करा

मासिक पाळीत कापड वापरण्यास हरकत नाही. मात्र, महिला कुणाला दिसू नये म्हणून अंधारात, कपड्यांच्या खाली हे कापड वाळत घालतात त्यामुळे ते नीट वाळत नाही, निर्जंतुक होत नाही. त्यामुळे कापड कडक होते आणि वापरताना त्वचेस इजा होण्याची शक्यता असते. चालताना त्रास होतो. त्याच अवस्थेत मुली काम करतात. त्यातून वेदना होतात. आणि संसर्ग वाढतो. म्हणूनच कापड वापरणार असचाल तर स्वच्छ उन्हात वाळवलेले कापड वापरा.

ग्रामीण भागासोबत शहरातही नॅपकिन्सची विल्हेवाट लावण्याची अडचण आहे. त्यामुळे कापडाचा पर्याय अधिक सोयीस्कर असल्याचे जाणकार सांगतात. परंतु, तुम्ही कापडाचा वापर करणार असाल, तर ते कापड वापरा. स्वच्छता हा मुद्दा आहे.

दिवसात किमान किती आणि किती काळ नॅपकिन वापरायचे ?

मासिक पाळीदरम्यान नॅपकिन वापरण्याचा मूळ उद्देशच स्वच्छता पाळणे हा आहे. म्हणून दिवसाला किमान ३ नॅपकिन्स याप्रमाणे दर ८ तासाला एक नॅपकिन बदलायला हवा. रक्तस्त्राव कमी होत असल्याच्या कारणावरुन मुली नॅपकिन दीर्घकाळ ठेवतात. मात्र, असे केल्याने नॅपकिनमध्ये रक्त साठून त्यात जिवाणूंची वाढ होऊ शकते. गर्भाशय आणि योनीमार्गाची त्वचा नाजूक असल्याने जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. लैंगिक संबंधातून झालेलं संसर्ग यामुळे वाढू शकतात. म्हणून नॅपकिन बदलण्याची दक्षता घ्यायला हवी. नॅपकिन खराब झाले नसल्याचे समजून मुली परत तेच नॅपकिन वापरतात. मात्र, ते कपडा वापरण्याहून अधिक धोकायदाक ठरू शकते.