भाजपच्या नाराजी नाटयावर राधाकृष्ण विखे-पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत शुक्रवारी महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक कामगिरीचा आढावा घेतला गेला. या बैठकीनंतर बोलताना सुजय विखे पाटील म्हणाले की उद्या नगर जिल्ह्यात भाजपची बैठक होईल. माझी आई जिल्हा परिषदेत काँग्रेसमध्ये आहे. त्याबाबत उद्या जिल्हा स्तरावर बैठक घेऊ त्यानंतर 31 तारखेला चित्र स्पष्ट होईल.

बैठकीनंतर बोलताना राधाकृष्ण विखे पाटीलांनी चर्चा सकारात्मक झाल्याचे सांगितले. ते म्हणाले की पत्नी येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या बैठकीत उमेदवार असणार की नाही त्याची उद्याच्या बैठकीत चर्चा करु. पक्ष ठरवेल तो उमेदवार असेल.

राम शिंदेंच्या तक्रारीवर विचाराल्यावर विखे म्हणाले की आजच्या बैठकीत विविध मुद्यांवर विस्तृत चर्चा झाली. राम शिंदे यांनी बैठकीत आपली भूमिका मांडली. परंतु चर्चा सकारात्मक झाली. प्रत्येक पक्षात थोडी फार नाराजी असतेच. चर्चेअंती मार्ग निघेल. मी देखील पक्षासमोर माझी भूमिका मांडली आहे.

विधानसभा निवडणूकीपूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला, त्यामुळे भाजपला मोठा फायदा होईल असे मागले जात होते. असे असताना माजी मंत्री राम शिंदे यांच्यासह अनेकांचा पराभव झाल्यामुळे विखे पाटलांच्या विरोधात पक्षातून नाराजी उफळली. त्यामुळे आजची बैठक महत्वाची होती.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/