रॅम्प वॉक करताना रॅपर अन् सिंगर ‘कार्डी बी’चा स्कर्ट निसटला, पुढं झालं ‘असं’ ! वारंवार पाहिला जातोय व्हायरल व्हिडीओ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अमेरिकेन रॅपर आणि सिंगर कार्डी बी काही दिवसांपूर्वीच पॅरीस फॅशन विकमध्ये सहभागी झाली होती. यावेळी ती खूपच हॉट अंदाजात दिसून आली. या शोनंतर ती पतीसोबत ब्लॅक ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये डिनरसाठी जाताना दिसली. तिचा हा ड्रेस एवढा ट्रान्सपरंट होता की, तिचे गारमेंट्सही यावेळी दिसून आले. आपल्या या सुपरहॉट लुकनं कार्डीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. यानंतर कार्डी पुन्हा एकदा चर्चेत आली होती, जेव्हा तिनं तिचा बिकिनी व्हॅक्सचा व्हिडीओ चक्क सोशलवर शेअर केला होता. पुन्हा एकदा कार्डीनं तिच्या हॉटनेसनं साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. तिचा आणखी एक व्हिडीओ सोशलवर राडा घालत आहे.

कार्डीनं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती ब्लॅक बोल्ड बिकिनी घालून घरातच रॅम्प वॉक करताना दिसत आहे. तिनं एक ब्लॅक स्कार्फ स्कर्टसारखा कमेरला गुंडाळलेला आहे जो रॅम्प वॉक करतना निसटतो आहे. सध्या कार्डीचा हा व्हिडीओ सोशलवर राडा घालत आहे. खास बात अशी की, हा व्हिडीओ वारंवार पाहिला जात आहे.

अलीकडेच कार्डीचे काही फोटो चर्चेत आली होती ज्यात बिकिनीत दिसत होती. आधीच हॉट दिसणारी कार्डी बिकिनीत आणखी हॉट वाटत आहे. खास बात अशी की, या फोटोत कार्डी तिच्या बमवरील टॅटू फ्लाँट करत होती.

कार्डीच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर ती अवघ्या 27 वर्षांची आहे. 2017 मध्ये कार्डी आणि ऑफ्सेट विवाहबद्ध झाले. कार्डीला एक मुलगी आहे. परंतु तिचा हॉटनेस पाहून कोणीही तिचं वय सांगताना चुकू शकतं. कार्डीच्या मुलीचं नाव कियारी आहे.

https://www.instagram.com/p/B7yC5cSgBut/