10 कोटी 26 लाखांना विकली ’पवित्र’ व्हिस्कीची 1 बाटली !

पोलिसनामा ऑनलाईन, दि. 24 फेब्रुवारी : आपल्याला जाणून आश्चर्य वाटेल की, स्कॉटलंडमध्ये तयार केलेली व्हिस्कीची एक अनोखी बाटली सुमारे 10 कोटी 26 लाख रुपयांना विकली गेली आहे. त्याला सिंगल माल्ट ’होली व्हिस्की’ असेही संबोधले जात आहे. स्कॉटलंडमध्ये मॅकलन 1926 ची 60 वर्षे जुन्या व्हिस्की बाटलीची ऑनलाईन विक्री झाली आहे.

याबाबत डेली मेलने दिलेल्या अहवालानुसार, मॉरे डिस्टिलरीच्या विशेष कास्क क्रमांक 263 वरून व्हिस्कीच्या अशा 14 स्पेशल बाटल्या तयार केल्या होत्या. यात 10 कोटी 26 लाख रुपयांना विकल्या गेलेल्या बाटलीची संख्या 14 असून त्यापैकी एक बाटली होती.

मॉरे डिस्टिलरीच्या विशेष कास्क क्रमांक 263 ला जगातील सर्वात प्रसिद्ध व्हिस्की कास्क देखील म्हटले जाते. या कास्कमधील साहित्य व्हिस्की तयार करण्यासाठी 1926 मध्ये तयार केले गेले होते. 1986 मध्ये ते 60 वर्षांनंतर बाटलीत पॅक केले गेले.

व्हिस्कीच्या एकूण 40 बाटल्या कॉक क्रमांक 263 वरून तयार केल्या गेल्या, परंतु 40 पैकी केवळ 14 बाटल्या दुर्मिळ संकलन चिन्हांकित केल्या गेल्या.

जगातील व्हिस्कीच्या एका बाटलीच्या विक्रमी किंमतीबद्दल बोलताना 15 कोटी 39 लाख रुपये इतकी आहे. 2019 मध्ये व्हिस्कीची ही बाटली लंडनमधील लिलाव विकली गेली आहे. ही बाटली देखील कॉक क्रमांक 263 सह पॅक केली होती.