White Hair Home Remedies | खोबरेल तेलात मिक्स करा ‘या’ 2 वस्तू, पांढरे केस मुळापासून होऊ लागतील काळे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – White Hair Home Remedies | आजकाल केमिकलयुक्त शाम्पू, साबण यांच्या वापरामुळे काळे केस पांढरे होऊ लागले आहेत. प्रत्येकजण या समस्येने त्रस्त आहे. परंतु असे अनेक प्रभावी घरगुती उपाय आहेत ज्यांच्या मदतीने पांढरे केस काळे करता येतात. पण खोबरेल तेलाचा वापर हा रामबाण उपाय मानला जातो (White Hair Home Remedies). या तेलाचा उपयोग जखमा कोरड्या करण्यासाठी आणि चेहर्‍याचे सौंदर्य टिकवण्यासाठी केला जातो. खोबरेल तेलात (Coconut Oil) काही गोष्टी मिसळून केसांना लावल्यास काही दिवसातच पांढर्‍या केसांची समस्या मुळापासून संपेल, यासंदर्भातील प्रभावी टिप्स जाणून घेवूयात (White Hare Solution)…

 

1. खोबरेल तेल आणि लिंबाचा रस (Coconut Oil and Lemon Juice)
अनेकदा खाणे-पिणे आणि केमिकलयुक्त गोष्टींच्या वापरामुळे केस पांढरे होऊ लागतात, त्यामुळे ते लगेच ठीक करता येत नाहीत. पांढरे केस काळे करण्यासाठी खोबरेल तेलात लिंबाचा रस मिसळा आणि केसांच्या मुळांना लावून चांगले मालिश करा. लिंबूमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात, जे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करतात. हे मिश्रण आठवड्यातून 4 वेळा वापरा. (White Hair Home Remedies)

 

हे मिश्रण बनवण्यासाठी एका भांड्यात खोबरेल तेल घ्या आणि त्यात लिंबाचा रस मिसळा. आता ते ठेवा आणि सुमारे 1 तासानंतर केसांना लावा. हे तेल लावल्यानंतर केसांच्या मुळांमध्ये मसाज करा, लवकरच पांढरे केस काळे होऊ लागतील.

2. खोबरेल तेल आणि कढीपत्ता (Coconut Oil and Curry Leaf)
या दोघांचे मिश्रण पांढरे केस काळे करण्यासाठी कोणत्याही रामबाण उपायापेक्षा कमी नाही. जर जास्त काळापासून केस पांढरे होण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर हा घरगुती उपाय अवश्य करा. यासाठी थोडा कढीपत्ता आणि खोबरेल तेल घ्या, हे दोन्ही एका भांड्यात घेऊन गरम करा. त्यानंतर ते केसांच्या स्कॅल्पवर वापरा. तुम्हाला दिसेल की काही महिन्यांच्या वापराने पांढर्‍या केसांपासून सुटका होईल.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- White Hair Home Remedies | how to get rid from white hair to black naturally permanent

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Benefits of Pomegranate | ’डाळिंब’ आरोग्यासाठी ब्रम्हास्त्र, रोज करा सेवन; हृदय मधुमेह आणि सूजसंबंधी आजारांत मिळेल दिलासा

 

Men’s Health | दीर्घकाळ आरोग्य कायम राखण्यासाठी ‘ही’ आहेत 5 पोषकतत्व, डाएटमध्ये ताबडतोब करा समावेश

 

Pune Pimpri Crime | निलंबित पोलीस असल्याचे सांगत PG मालकाला मारहाण, हिंजवडी परिसरातील घटना