White Hairs Problem Solution | तुमचेही केस पांढरे होतात तर जाणून घ्या ‘हे’ घरगुती उपाय, केस काळेकुट्ट अन् दाट होतील; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – White Hairs Problem-Solution | पांढऱ्या केसांच्या समस्येवर उपाय: आजकाल लहान वयातच लोकांचे केस पांढरे होतात. यामागे मानसिक तणाव, जंक फूड आणि अस्वस्थ जीवनशैली हे कारण असू शकते. पांढरे केस पुन्हा काळे करण्यासाठी लोक अनेक रासायनिक उत्पादने वापरतात, ज्यामुळे काहीवेळा तुमच्या शरीराला हानी पोहोचते. आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगत आहोत, ज्यामुळे पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे होण्यास मदत होईल. (White Hairs Problem-Solution)

 

1. केसांसाठी खोबरेल तेल आणि कापूर वापरणे
खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह तेल (olive oil) हलके गरम करून त्यात 4 ग्रॅम कापूर मिसळा. कापूर तेलात चांगले मिसळले की, केसांना मसाज करा. राखाडी केस कमी करण्यासाठी हा नुस्खा उपयुक्त आहे.

 

2. आवळा वापरणे
आवळा हे केसांची निगा राखण्यासाठी ओळखले जाते. यासाठी तुम्ही कोरडा आवळा (Gooseberry) पाण्यात उकळा आणि पाणी अर्धे होईपर्यंत गरम करा. आता त्यात मेंदी आणि लिंबाचा रस मिसळा आणि केसांना लावा. असे केल्याने लहान वयात पांढरे होणारे केस दूर होतात. (White Hairs Problem Solution)

3. आलं आणि मधाचा वापर
आलं स्वच्छ धुवून किसून घ्यावा. मध आणि किसलेला आलं एकजीव करावं आणि आठवड्यातून किमान 2 वेळेस केसांना लावावे. हळू हळू पांढरे केस कमी होऊ लागतात.

 

4. दही वापरणे
केसांसाठी दही खूप फायदेशीर ठरू शकते. किसलेल्या टोमॅटोमध्ये दही , थोडासा लिंबाचा रस आणि निलगिरी तेल घाला. हे सर्व चांगले मिसळा आणि डोक्याला मालिश करा,आठवड्यातून 2-3 वेळा. यामुळे केस पांढरे (white hairs) होण्यापासून बचाव होईल आणि केस मजबूत होतील.

 

5. दुध्या भोंपळा (दुधी भोपळा) आणि खोबरेल तेल
आपल्या केसांसाठी खोबरेल तेल वरदान आहे. त्यात दुधी भोपळा स्वच्छ धुवून, बारीक करून
तेलात घालावा आणि 5 ते 10 मिनट तेल गरम करावे आणि नीट गाळून घ्यावे.
ह्या तेलाने काही मिनट व्यवस्थित मसाज करावी. पांढर्‍या केसांची समस्या कमी होण्यास मदत होते.

 

 

Web Title :- White Hairs Problem Solution | white hair problem solution know here home remedies for dark hair

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Paratha Recipes for Weight Loss | थंडीत देखील 3 प्रकारचे ‘हे’ चविष्ट पराठे शरीरास ठेवतील एकदम ‘गरम’ अन् ‘तंदुरूस्त’, वजन घटवण्यात देखील अत्यंत उपयोगी, जाणून घ्या

Mumbai High Court | हाय कोर्टाचा निर्वाळा ! आत्महत्येनंतर तब्बल 29 वर्षांनी मिळाला माय-लेकीला न्याय; पतीला ठोठावली शिक्षा

Mobile Earphone Side Effects | ईयरफोन वापर करत असाल तर व्हा सावध ! ‘इतके’ तास ऐकली गाणी तर ‘निकामी’ होतील कानांच्या नसा !

Old Pension Scheme | जुनी पेन्शन योजना सुरू करण्यावर निर्णयाची अपेक्षा, संसदेत मंत्र्यांनी सांगितले कुठे अडकले प्रकरण; जाणून घ्या