जगातील एकमेव नेते बनवले PM नरेंद्र मोदी, ज्यांच्यासाठी ‘व्हाइट व्हाऊस’नं उचललं ‘हे’ पाऊल

वृत्तसंस्था – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे व्हाइट हाऊसमधून कामकाज चालते. राष्ट्राध्यक्षांचे ते कार्यालय आहे. जगातील सर्वात जास्त शक्तिशाली असे प्रशासकीय कार्यालय समजल्या जाणाऱ्या व्हाईट हाऊसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवर फॉलो करण्यात आलं आहे. नरेंद्र मोदी जगातील एकमेव राजकीय व्यक्ती आहेत, ज्यांना हा बहुमान मिळाला आहे. त्यासोबतच भारतातील इतर दोन अकाऊंटसना सुद्धा व्हाईट हाऊसकडून फॉलो करण्यात आले आहे.

अलिकडच्या काळात भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध खूप मजबूत झाले आहेत. याचे उदाहरण म्हणजे आता व्हाईट हाऊसने आपल्या ट्विटर हँडलवरून पंतप्रधान मोदींना फॉलो करण्यास सुरुवात केली आहे. व्हाईट हाऊसच्या ट्विटर हँडलवरुन जगातील इतर कोणत्याही नेत्याला फॉलो केले जात नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील एकमेव राजकीय नेते आहेत ज्यांना व्हाईट हाऊस फॉलो करत आहे.

व्हाईट हाऊस यांना करते फॉलो ?

आतापर्यंत व्हाईट हाऊस एकूण 19 ट्विटर अकाउंटला फॉलो करत आहे. यापैकी 16 जण अमेरिकेचे आणि 3 भारताचे आहेत व्हाईट हाऊसच्या ट्विटर हँडलमध्ये भारतातील पीएमओ इंडिया आणि भारताचे राष्ट्रपती आणि नरेंद्र मोदी यांचे ट्विटर हँडल आहे. नुकतेच भारताने अमेरिकेला औषध दिल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. आता पीएम मोदी यांनाही ट्विट केले आहे. त्यास उत्तर म्हणून पंतप्रधान मोदींनी त्यांचे आभार मानत म्हटले की भारत आणि अमेरिका मिळून कोरोनाला पराभूत करतील.