अमेरिकेनं कच्च्या मालाच्या निर्यातीवर घातली बंदी; भारतातील लसीला मिळेना ‘गती’ तर US कडून उत्तर देण्यास टाळाटाळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात कोरोनाने थैमान घातले असून, रुग्णसंख्येच्या तुलनेत लसीचा पुरवठा कमी पडत असल्याचे चित्र समोर दिसत आहे. यावरून सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. त्यातच आता अमेरिकेने कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल बंद केला आहे. कच्च्या मालाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आलीय. या प्रकरणावरून भारताने अमेरिकेशी सवांद साधण्याचा प्रयत्न केल्यास तिथून कोणतेही उत्तर मिळाले नाही. लसीचे उत्पादन गतीने होण्यासाठी पुण्यातील सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियानं अमेरिकेकडे बंदी हटविण्याची विनंती केली आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या प्रशासनाने कच्च्या मालावरील निर्यात बंदी केली आहे. यावरून लस बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील निर्यात बंदी संबंधी २ वेळा व्हाईट हाऊसला प्रश्न विचारण्यात आला. याबाबत पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. व्हाइट हाऊसच्या माध्यम सचिव जैन पाक्सी यांना कच्च्या मालाच्या निर्यात बंदीबाबत विचारण्यात आलं. याद्वारे कोणतीही प्रतिक्रिया येथून देण्यात आली नाही. भारतात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा विचार करता अमेरिकेनं लावलेली निर्यात बंदी लवकरात लवकर उठवणं अतिशय आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. तसेच, अमेरिकेच्या कोविड-१९ रिस्पॉन्स टीमच्या वरिष्ठ सल्लागार आणि नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ अॅलर्जी अँड इन्फेक्शन डिसीजचे संचालक डॉ. अँथनी फॉसी आणि डॉ. अँडी स्लेवीट यांनी पत्रकारानं विचारलेल्या प्रश्नावर कोणतीही प्रतिक्रया दिली नाही. “मला माफ करा, मला याबाबत कोणतीही माहिती नाही. मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला हवं. पण याबाबत सध्या माझ्याकडे कोणतंही उत्तर नाही, असे डॉ. फॉसी यांनी सांगितलं आहे.

तसेच, या निर्यात बंदीच्या निर्णयाबाबत आणखी एका पत्रकार परिषदेत सवाल करण्यात आला. भारत सध्या कोरोना लस उत्पादन करण्याच्या कच्च्या मालाच्या तुटवड्याच्या समस्येचा सामना करत आहे. तेथील अधिकारी कच्च्या मालाच्या निर्यात बंदी हटविण्याचा आग्रह करत आहेत. बायडन प्रशासन याबाबत विचार करत आहे, असं भारताच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात तुम्ही अधिक माहिती आणि नेमका कितीवेळ लागेल याबाबत सांगू शकता का ? असा सवाल एका पत्रकारानं विचारला होता. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या प्रशासनानं कोरोना लस निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. सीरमनं बंदी हटविण्यासाठी बायडन यांच्याकडे विनंती देखील केली आहे, त्यामुळे नेमकं कोणता कच्चा माल येथून भारताला जातोय आणि सीरमची समस्या सोडविण्यासाठी तुमची योजना काय?, याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला होता.

या दरम्यान, डॉ. स्लेवीट यांनी सांगितले की, आपण सध्या महामारीच्या जागतिक संकटाचा सामना करत असून अतिशय गांभीर्यानं याकडे पाहात आहोत. आम्ही कोव्हॅक्सला निधी पुरवला आहे. द्विपक्षीय संबंधांच्या पार्श्वभूमीवर लसीचा पुरवठा केला आहे. आणि प्रत्येक समस्येचं निराकरण करण्यासाठी कटिबद्ध आहोत असे ,त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, त्या प्रश्नावर विकसीत आणि विकसनशील देशांमध्ये कोरोना लसीच्या पुरवठ्या संदर्भात जी असमानता दिसत आहे. ती अतिशय अस्विकारार्ह आहे, असे उत्तर व्हाइट हाऊसकडून दिल गेलं आहे.