Video : ‘फिटनेस क्‍वीन’ दिशा पाटनीचा ‘थरारक’ स्टंट, अभिनेता कुणाल खेमूकडून ‘अशी’ कमेंट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची फिटनेस क्विन दिशा पाटनीने नुकताच भारत हा सिनेमा केला आहे. यानंतर लवकरच ती आता मलंग या सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमामुळे दिशा नेहमीच चर्चेत असते. नुकताच दिशाने एक व्हिडीओ सोशलवर शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ झपाट्याने शेअर होताना दिसत आहे. या व्हिडीओत दिशा खतरनाक स्टंट करताना दिसत आहे. दिशाच्या चाहत्यांना हा व्हिडीओ चांगलाच आवडला आहे.

दिशाच्या व्हिडीओत दिसत आहे की, दिशा कार्ट व्हिल मारत आहे जी तेवढीच अवघडही आहे. या व्हिडिओत दिशाचा ट्रेनरही तिला ट्रेन करताना आणि हेल्प करताना दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये दिशा म्हणते की, “खूप दिवसानंतर ट्रेनरकडून ट्रेनिंग घेताना” या व्हिडीओत दिशाने नदीम अख्तरला टॅग केले आहे. नदीम अख्तर दिशाचा ट्रेनर आहे.

https://www.instagram.com/p/BzImQWegnpu/

दिशाचे फोटो आणि व्हिडीओ सोशलवर नेहमीच व्हायरल होत असतात आणि चर्चेत असतात. दिशाचा हा व्हिडीओ चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. अनेक चाहत्यांनी दिशाच्या या व्हिडीओवर कमेंट केली आहे. एक युजर म्हणतो की, “नवीन वंडर वुमन.” तर दुसरा युजर म्हणतो की, सर्वात अ‍ॅथलेटीक अ‍ॅक्ट्रेस. दिशाच्या या व्हिडीओवर फक्त तिच्या चाहत्यांनीच नाही तर, पटौदी खानदानाचा जावई कुणाल खेमूनेही शानदार कमेंट केली आहे. दिशाचे कौतुक करत कुणालने कमेंट केली आहे की, “शाब्बास, माझा चित्ता.”

वर्कफ्रंट बद्दल सांगायचे झाले तर, लवकरच दिशा मलंग सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तिच्या व्यतिरीक्त कुणाल खेमू देखील दिसणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त – 

पाणी पिण्याबाबत आहेत अनेक गैरसमज, जाणून घ्या सत्य 

निरोगी आरोग्य जगण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश 

चवीने खाल्ले जाणारे मैद्याचे पदार्थ आरोग्यासाठी ‘घातक’ 

सावधान ! मधुमेहाच्या रूग्णांचे शुगरफ्रीमुळे वाढू शकते वजन