काय सांगता ! होय, तांदळाच्या पिठानं उजळेल ‘त्वचा’ अन् ‘पिंपल्स’ देखील होतील दूर, जाणून घ्या कसा करायचा वापर

पोलीसनामा ऑनलाइन – थंडीच्या दिवसात त्वचेचा रंग उन्हाळ्याच्या तुलनेत अधिक काळवंडतो. तसेच अनेक महिला थंडीच्या दिवसात सनस्क्रीन लोशन लावणं टाळतात. ज्या महिलांना सतत उन्हामध्ये राहावं लागतं त्यांना त्वचेच्या विविध समस्यांचा सामना करावा लागतो. म्हणून आज आम्ही तुम्हाला तांदळाच्या पिठापासून तयार होणाऱ्या एका फेस पॅक बद्दल सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या चेहऱ्याची त्वचा काळी पडण्यापासून बचाव करु शकता.

तांदळाच्या पिठात PABA नावाचे तत्व असतं. जे चेहऱ्यावर नैसर्गिक सनस्क्रिनचे काम करते. तसेच आपल्या चेहऱ्यावर असलेले एजिंगचे इफेक्टही कमी करते. तांदळाच्या पिठामध्ये तेल Observing तत्व असते. ज्याने आपल्या त्वचेला फ्रेश लूक प्राप्त होतो.

तांदळाच्या पिठाचा फेसपॅक तयार करण्याची पद्धत आणि कृती
फेसपॅक चेहऱ्यावर लावण्यापूर्वी चेहरा डीप क्लीन करा. नंतर तांदळाच्या पिठात कच्च दूध एकत्र करुन पेस्ट तयार करा. तयार पेस्ट चेहऱ्यावर ५ मिनिटांपर्यंत स्क्रब करा. चेहऱ्याबरोबर मानेवर सुद्धा स्क्रब करु शकता.

परत एका वाटीत, २ चमचे तांदळाचे पीठ, अर्धा चमचा हळद, एक चमचा गुलाब पाणी आणि एकच चमचा मध एकत्र करुन फेसपॅक तयार करा. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. सुकल्यानंतर हलक्या हाताने मसाज करुन फेसपॅक काढून टाका. चेहऱ्यासोबत मानेवर सुद्धा याचा वापर करु शकता.

तांदळाचे पीठ आणि दही
तांदळात अमिनो ॲसिड आणि व्हिटॅमिन असतात. जे त्वचेसाठी एखाद्या व्हाइटनिंग एजंटप्रमाणे काम करते. तसेच त्यावर जमा असलेली घाण स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. तांदळाच्या पिठात ३ चमचे दही आणि एक चमचा मध एकत्र करुन चेहऱ्यावर लावा. फेसपॅक सुकल्यानंतर आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. काही दिवसात तुम्हाला तुमच्या चेहऱ्यात बदल दिसेल.

तांदळाच्या पिठाची फेस पावडर
फेस पावडर म्हणून तांदळाचे पीठ वापरु शकता. त्यात असलेले तत्व चेहऱ्यावरील जास्तीचे ऑइल शोषून घेत. त्याने त्वचा तेलकट दिसत नाही. अनेक महिलांना फेस पावडर लावल्याने चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या उद्भवते. पण तांदळाच्या पिठाची पावडर चेहऱ्यावर लावल्याने ही समस्या निर्माण होत नाही.

बाकीचे फायदे…
तांदळाच्या पीठाने चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि डार्क सर्कल्स दूर होतात. त्वचेचा ग्लो वाढण्यासाठी मदत होते. हे त्वचेसाठी एक उत्तम एक्सफोलिएटर प्रमाणे काम करते आणि मृत पेशी काढून टाकण्यासाठी मदत करतात. यामुळे तुमची त्वचा फ्रेश दिसण्यासाठी मदत होते.

(टिप : कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरुर घ्या.)