कोरोना संक्रमितांनी चुकूनही करू नका ‘या’ औषधाचा वापर, WHO ने दिला इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संपूर्ण जगात आज कोरोनाने थैमान घातले आहे. या कोरोनामुळे अनेकांना आपला जावं गमवावा लागला आहे. कोरोनावर उपचार म्हणून अनेक देशांमध्ये विविध औषधांचा वापर करण्यात येत आहे. मात्र आता जागतिक आरोग्य संघटनेने काही औषंधासंदर्भात इशारा दिला आहे.

सध्या कोरोनाचा उपचार करण्यासाठी हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधाचा वापर केला जात आहे. सुरुवातीच्या काळात जेव्हा कोरोनाचा उद्रेक झाला तेव्हा या औषधाचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आला होता. कोरोनाच्या काळात हे औषध ‘गेम चेंजर’ असल्याचे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सांगण्यात आले होते. मात्र आता जागतिक आरोग्य संघटनेकडून या औषधापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या औषधासंदर्भात ट्विट करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, संक्रमित रुग्णांवर याचा कोणताही परिणाम होत नाही. तसेच या औषधांमुळे रुग्णालयात भरती होणाऱ्यांचे प्रमाणसुद्धा कमी झालेले नाही. उलट या औषधाचा विपरीत परिणाम रुग्णांवर होण्याची शक्यता आहे. असे जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले आहे.