Coronavirus : महाराष्ट्रासह ‘या’ 7 राज्यांना लॉकडाऊनमध्ये सूट नका देऊ, WHO नं दिला भारताला सल्ला

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  कोरोना महामारीचे वाढते संकट पाहता जागतिक आरोग्य संघटनेने भारताच्या सात राज्यांना लॉकडाऊनमध्ये सूट न देण्याचा सल्ला दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे की, महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, दिल्ली, तेलंगना, चंदीगढ आणि बिहारमध्ये ज्या प्रकारे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. याकडे पाहता या राज्यांमध्ये लॉकडाऊन चालू ठेवण्याची गरज आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने सल्ला दिला आहे की, ज्या राज्यांमध्ये 5 टक्क्यांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत तिथे लॉकडाऊन चालू राहणे गरजेचे आहे. यांचा हा सल्ला पुर्ण राज्यात लागू होणार नाही. कारण राज्यांचे काही जिल्हे कोरोनामुळे जास्त प्रभावित झाले आहे. त्यामुळे तेथे सक्तीने लॉकडाऊनचे पालन करणे गरजेचे आहे.

हॉटस्पॉट परिसरामध्ये लॉकडाऊन कडक करण्यात येऊ शकते. लॉकडाऊनमध्ये काही ठिकाणी सूट दिली असूनही जागतिक आरोग्य संघटनेकडून वेळोवेळी सल्ला जातो की, कुठे संक्रमण जास्त वाढू शकते आणि याला रोखण्यासाठी काय काय उपाय केले जाऊ शकतात.