शस्त्र परवानाधारकांनी यूआयएन क्रमांक प्राप्त करुन घ्यावा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

नॅशलन डाटाबेस ऑफ आर्म लायसन (एनडीएएल) या प्रणालीद्वारे शस्त्र परवानाधारकांची माहिती गोळा केली जाते.  प्रणालीद्वारे माहिती अद्ययावत केल्यानंतर प्रत्येक परवानाधारकास विशिष्ट ओळख क्रमांक म्हणजेच युनिक आयडेंटीफि केशन (युआयएन) नंबर दिला जातो. ज्या शस्त्र परवानाधारकांकडे यापुढे युआयएन नंबर नसेल त्यांचा परवाना रद्द होणार असल्याचे पोलीस उपायुक्त शेषराव सुर्यवंशी यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.
[amazon_link asins=’B07B1B5CVK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cc7aa08a-c711-11e8-8888-0ba3bd9a18d9′]

केंद्र शासनाच्या गृहमंत्रालयामार्फत १६ जुलै २०१६ पर्यंतच्या शस्त्र परवानाधारक, शस्त्र  दुरुस्ती व खरेदी-विक्री परवानाधारकांची माहिती नॅशलन डाटाबेस ऑफ आर्म लायसन (एनडीएएल) या प्रणालीमध्ये नोंदविण्याची मुदत ३१ मार्च २०१९ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
[amazon_link asins=’B07C8KJBRY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d146f563-c711-11e8-8e51-610018be9e74′]

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रासी सर्व शस्त्र परवानाधारकांनी तातडीने यु.आय.एन. नंबर घ्यावेत. ज्या शस्त्र परवाना धारकाने यु.आय.एन नंबर प्राप्त करुन घेतला नाही अशा धारकांना www.punepolice.gov.in या बेवसाइटवर फॉर्म उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. शस्त्र परवाना धारकांनी विहित नमुन्याचा फॉर्म भरुन नागरी सुविधा केंद्र, पोलीस आयुक्त कार्यालय येथे ३० सप्टेंबर पर्यंत जमा करावेत. फॉर्म सोबत परवान्याची साक्षांकित प्रत व पॅन कार्डची छायांकीत प्रत जोडावी.

१५ पाेलिस निरीक्षकांच्या बदल्या