हिमाचलमध्ये जनावरांचे बनतील ‘Aadhaar क्रमांक’ ! ‘निराधार’ गाईला ‘आधार’ दिल्यास मिळतील दरमहा 500 रुपये

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : हिमाचलमध्ये पशुसंवर्धन विभाग (Animal Husbandry) च्या गोसदन, गोशाळा आणि गो अभयारण्य योजनांना मदत आणि राष्ट्रव्यापी कृत्रिम गर्भाधान कार्यक्रम फेज -2 चा शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी सीएम जयराम ठाकूर म्हणाले की, दीड वर्षांच्या आत हिमाचल प्रदेशला देशाचे निराधार प्राणीमुक्त राज्य बनवण्यासाठी प्रयत्न केले जातील. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी सर्व जिल्ह्यांतील डीसी, पशुसंवर्धन अधिकारी आणि गोसदन संचालकांशी बोलून सूचना दिल्या. माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री जयराम ठाकूर म्हणाले की, जेव्हा राज्य प्लास्टिकमुक्त होऊ शकते, तेव्हा राज्याला निराधार प्राणीमुक्त देखील केले जाऊ शकते.

घरातील पाळीव आणि बाहेर फिरत असलेल्या गुरांची होईल टॅगिंग

पशुसंवर्धन विभाग आता घरातील पाळीव गुरांबरोबर निराधार असलेल्या गुरांचेही टॅगिंग करणार आहे. याअंतर्गत, आधार क्रमांकाच्या धर्तीवर गुरांचा 12 अंकी क्रमांक जारी केला जाईल. याद्वारे निराधार गुरांची जीवन-मृत्यूविषयीची माहिती कळेल. तसेच गोसदन, गोशाळा, गो अभयारण्य योजना सहाय्य अंतर्गत भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने, पशु उत्पादन आणि आरोग्यासाठी माहिती नेटवर्क आणि राष्ट्रीय पशुवैद्यकीय नियंत्रण कार्यक्रमांतर्गत संपूर्ण टॅगिंगनंतर त्या सर्व गोसदन, गोशाळा आणि गो अभयारण्यच्या निराधार गुरांच्या देखभालीसाठी दरमहा 500 रुपये प्रति गाय देण्यात येतील, त्यामध्ये गुरा-ढोरांची संख्या 30 किंवा त्याहून अधिक आहे. हे फायदे शासनाद्वारे स्थापन केलेल्या गो अभयारण्य, गोशाळा, पंचायत, महिला मंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्वयंसेवी संस्था इत्यादीद्वारे चालवल्या जाणाऱ्या गो अभयारण्य व गोशाळांना देण्यात येतील.

कृत्रिम रेतनासाठी मोफत सुविधा

सीएम जयराम ठाकूर म्हणाले की, राष्ट्रव्यापी कृत्रिम गर्भाधान कार्यक्रम फेज 2 अंतर्गत गोवंशाच्या जाती सुधारण्यासाठी कृत्रिम रेतनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असून यामुळे शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. राज्यातील आठ लाखाहून अधिक शेतकर्‍यांना याचा फायदा होणार असल्याचे ते म्हणाले.