शिवसेनेचा मुख्यमंत्री ठरवणार शरद पवार ?

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – भाजपने सत्तास्थापनेसाठी नकार दिल्यानंतर आता शिवसेना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने सरकार स्थापन करणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता राज्यात महाशिवआघाडी स्थापन होणार असल्याचे नक्की झाले आहे. मात्र यामध्ये शरद पवार हे महत्वाची भूमिका बजावणार असून शिवसेनेला दोन्ही पक्षांचा पाठिंबा मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे शिवसेनेचे राष्ट्रवादीकडे लक्ष लागून आहे. त्यामुळे शरद पवार हे यामध्ये महत्वाची भूमिका पार पडणार आहे.

मुख्यमंत्रीपदावरून वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये वाद झाल्यानंतर शिवसेनेने कडक भूमिका घेत मुख्यमंत्रीपदावर आपला दावा कायम ठेवला. त्यानंतर भाजपने सरकार स्थापण करण्यास नकार दर्शवला असून आज दोन्ही पक्ष याबाबत निर्णय घेणार आहेत. त्यामुळे शरद पवार यामध्ये मुख्यमंत्री ठरवण्यात महत्वाची भूमिका पार पाडणार आहेत. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार, ते उद्धव ठाकरे यांच्या नावालाच पसंती देतील.

मात्र त्याआधी आदित्य ठाकरे यांचे नाव देखील शिवसेनेच्या वतीने पुढे करण्यात आले आहे. त्यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काय भूमिका घेणार आणि सत्तास्थापनेचा निर्णय झाल्यास कुणाला मुख्यमंत्रीपदी बसवणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, काँग्रेस आज चार वाजता महत्वाच्या नेत्यांची बैठक घेणार असून यानंतर ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

Visit : Policenama.com