COVID-19 Lockdown : WHO च्या मुख्य वैज्ञानिकांनी लॉकडाउनबाबत दिला इशारा; म्हणाल्या – ‘याचे परिणाम भयानक आहेत’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतात सध्या कोरोना व्हायरसची दुसरी लाट सुरू आहे. संक्रमितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांत विकेंड लॉकडाउन, नाईट कर्फ्यू सारखे प्रतिबंध करण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी पूर्ण लॉकडाउन लावण्याबाबत विचार-विमर्श चालू आहे. त्या दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी लॉकडाउन बाबत मोठे विधान केले आहे. त्या म्हणाल्या की, याचे परिणाम फार भयानक असतील. त्याचबरोबर त्यांनी साथीच्या दूसरी लाट नियंत्रित करण्यासाठी लोकांच्या भूमिकेवर जोर दिला आहे.

डॉक्टर स्वामीनाथन म्हणाल्या, ‘तिसर्‍या लाटेचा विचार करेपर्यंत आणि पुरेशा लोकांना लसी देईपर्यंत आपल्याला दुसर्‍या लाटेचा सामना करावा लागेल. या साथीच्या आजारात आणखीही अनेक लाटा येऊ शकतात. डब्ल्यूएचओ कोविशिल्ट लसच्या दोन डोस दरम्यान 8-12 आठवड्यांच्या अंतरांची शिफारस देण्यात आली आहे. यावर स्वामीनाथन म्हणाल्या की, “सध्या मुलांना लस लावण्याचा सल्ला दिला जात नाही, परंतु हो दोन डोसांमधील अंतर 8 ते 12 आठवड्यांपर्यंत वाढवता येईल.”

डब्ल्यूएचओचे प्रादेशिक संचालक डॉ. पूनम खेत्रीपाल यांनीही या लसीवर भर दिला आहे. 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिनानिमित्त त्या म्हणाल्या की, संक्रमणाची नवी लाट संपूर्ण प्रदेशात पसरत आहे. लसीचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. विशेष गोष्ट म्हणजे भारतात दररोज सरासरी 26 लाख लस डोस दिले जात आहेत. या प्रकरणात केवळ अमेरिकाच भारतापेक्षा पुढे आहे. तेथे दररोज सरासरी 30 लाख डोस दिले जात आहेत.

दरम्यान, लॉकडाऊनवर पुण्यातील तज्ज्ञांनी आक्षेप नोंदविला आहे. प्रोफेसर एल.एस. शशिधरा म्हणाल्या, गेल्या वर्षी लॉकडाऊन दरम्यानही पुण्यात अनेक हॉटस्पॉट होती. आंशिक स्वरूपात का असेना लॉकडाउन हटविताच आकडेवारी पुन्हा वाढू लागली. 10 दिवसांच्या लॉकडाउनेही मदत झाली नाही. आकडेवारी सतत वाढत होती. लॉकडाऊन दरम्यानही कम्युनिटी ट्रांसमिशनमुळे या विषाणूचा प्रसार त्या भागातील छोट्या छोट्या समुहात पसरू लागला. लॉकडाउन हटविताच ते अधिक वेगाने पसरणार आहे. मार्चच्या सुरूवातीपासूनच कोरोना संसर्गाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.