WHO प्रमुखांनी केली भारताची प्रशंसा, म्हणाले – ‘Covid-19’ च्या समाप्तीसाठी उचलली निर्णायक पावले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अ‍ॅधानॉम घेब्रियेसिस (WHO chief tedros adhanom ghebreyesus)  यांनी कोरोना लसीसंदर्भात भारताची प्रशंसा केली आहे. साथीच्या रोगाचा अंत करण्यासाठी भारत सरकारने घेतलेल्या निर्णयाचे कौतुक करताना ते म्हणाले की, जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश म्हणून भारताने कोविड -19 साथीला संपुष्टात आणण्याचा आपला संकल्प पूर्ण केला आहे. टेड्रोस (WHO chief tedros adhanom ghebreyesus) यांनी ट्विट केले की, ‘भारत कोरोना साथीचा नाश करण्यासाठी सातत्याने निर्णायक पावले उचलत आहे. जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश म्हणून भारत आपले काम करीत आहे.’ साथीच्या विरोधातील लढाईत पंतप्रधान मोदींनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करताना त्यांनी लिहिले की, ‘जर आपण एकत्रितपणे काम केले तर प्रभावी लस वापरून प्रत्येक क्षेत्रातील अधिक असुरक्षित लोकांना वाचवण्याचे लक्ष्य निश्चित केले जाऊ शकते.’

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या मदतीमुळे जगातील इतर कोणत्याही देशांपेक्षा जास्त प्रमाणात लस तयार करण्याची क्षमता भारताकडे आहे. याव्यतिरिक्त भारताने अ‍ॅस्ट्रॅजेनेका, नोव्हाव्हॅक्स आणि गामाले रिसर्च इन्स्टिट्यूटच्या लसींचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी अधिकृतता प्राप्त केली आहे.

130 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात लवकरच जगातील सर्वात मोठी देशांतर्गत लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. पोलिओ आणि कॉलरासारख्या विविध रोगांच्या लसीकरण मोहिमेचा देशाला चांगला अनुभव आहे. भारतात प्रथम श्रेणीचे आरोग्य सेवा कर्मचारी आणि 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना लस दिली जाईल. सहा ते आठ महिन्यांत सुमारे 250 मिलियन लोकांचे लसीकरण केले जाईल असे सरकारचे उद्दिष्ट आहे.